धाराशिव – समय सारथी
राज्यातील 12 जिल्हा परिषद व 125 पंचायत समिती मधील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आदर्श आचारसंहिता लागु झाली आहे. राज्य निवडणुक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी याची घोषणा केली, 50 टक्केच्या आत आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये निवडणुका होणार आहेत. 1 जुलै 2025 ची मतदार यादी ग्राह्य धरली जाणार आहे.
16 जानेवारी ते 21 जानेवारी पर्यंत अर्ज भरणे, 22 जानेवारी अर्ज पडताळणी, 27 जानेवारी दुपारी 3 पर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येतील तर त्याच दिवशी 3.30 नंतर अंतीम उमेदवार यादी व चिन्ह वाटप होईल. 5 फेब्रुवारीला मतदान तर 7 फेब्रुवारीला मतमोजणी करण्यात येणार आहे. मतदानच्या 24 तास अगोदर प्रचार संपवावा लागणार आहे. 1 हजार 462 पंचायत समिती सदस्य पदासाठी ही निवडणूक होणार आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव व लातूर या 12 जिल्हा परिषदमधील निवडणुका होणार आहेत. मतदार यांना जिल्हा परिषद व पंचायत समिती असे 2 मतदानाचे हक्क असणार आहेत. उमेदवार अर्ज ऑफलाईन पद्धतीने स्वीकारले जाणार आहेत. 25 हजार 482 मतदान केंद्रावर निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे.












