धाराशिव – समय सारथी
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात 18-19 व 20-29 या वयोगटातील युवा मतदारांची भुमिका निर्णायक ठरू शकते. 18-19 वयोगटातील नव मतदारांची संख्या 37 हजार 730 असुन हे पहिल्यांदा मतदानाचा हक्क बजावतील तर 20-29 या वयोगटातील मतदारांची संख्या तब्बल 3 लाख 98 हजार 314 इतकी आहे. 4 लाख 35 हजार युवा मतदार यांचा कौल महत्वाचा निर्णायक ठरणार आहे.
महिला मतदारांची संख्या 9 लाख 46 हजार 054 इतकी आहे तर पुरुष मतदार यांची संख्या 10 लाख 58 हजार 156 इतकी आहे. युवा वर्गाचा कौल देखील खासदार होण्यासाठी महत्वाचा ठरणार आहे.
उस्मानाबाद लोकसभा मतदार संघात 20 लाख 8 हजार 92 इतके मतदार असुन 2 हजार 139 मतदान केंद्र असणार आहेत. मतदानासाठी 2 हजार 354 ईव्हीएम मशीन उपलब्ध आहेत. औसा मतदार संघात 3 लाख 20 हजार 565, उमरगा 3 लाख 9 हजार 715, तुळजापूर मतदार संघात सर्वाधिक 3 लाख 72 हजार 912, उस्मानाबाद 3 लाख 62 हजार 94, परंडा 3 लाख 24 हजार 726 व बार्शी येथे 3 लाख 18 हजार 80 मतदार आहेत. तुळजापूर मतदार संघात सर्वाधिक मतदार आहेत. युवा वर्गाचा कौल महत्वाचा ठरणार आहे.