धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यातील आंबेडकरवादी चळवळीचे ज्येष्ठ नेते पॅंथर यशपाल नाना सरवदे यांच्या प्रथम स्मृतीदिनानिमित्त स्मरणिका प्रकाशन व अभिवादन सभा 26 फेब्रुवारी रोजी होणार आहे. केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारीता राज्यमंत्री तथा रिपाईचे अध्यक्ष रामदास आठवले यांच्या प्रमुख अतिथीत हा कार्यक्रम सोहळा होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विचारवंत तथा भारतीय दलित पॅंथरचे संस्थापक सदस्य ज वी पवार हे असणार असून अविनाश महातेकर, राजाभाऊ ओव्हाळ, ज्येष्ठ पत्रकार राहुल कुलकर्णी, विचारवंत तथा विधीज्ञ अॅडव्होकेट राज कुलकर्णी, प्राध्यापक डॉक्टर सुरेश वाघमारे, कांबळे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
स्मरणिका प्रकाशन व अभिवादन सभा 26 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन वाजता परिमल मंगल कार्यालय आकाशवाणी केंद्राजवळ धाराशिव येथे होणार आहे.
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्या यशपाल सरवदे यांच्या स्मारक ठिकाणी नागबोधी रिसर्च सेंटर येथे सकाळी 11 वाजता अभिवादन कार्यक्रम होईल व दुपारी दोन वाजता धाराशिव शहरात नियोजित ठिकाणी अभिवादन सभा होईल. तरी या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन अध्यक्ष सुषमा यशपाल सरवदे, उपाध्यक्ष अरुण बनसोडे, कोषाध्यक्ष एमडी जानराव, सचिव सुदेश माळाले, सदस्य दीपक डावरे सुनील बनसोडे,सोनिया डांगे, प्रेरणा स्वरूप संगारे, चेतन शिंदे,पृथ्वीराज चिलवंत व नागबोधी रिसर्च सेंटर च्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी केले आहे.