बळकटी – ग्रामीण भागात सुविधा निर्माण झाल्याने रुग्णांची होणार सोय, विविध योजनांची अंमलबजावणी
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांच्या प्रयत्नाने आरोग्य क्रांती होत असुन धाराशिव जिल्ह्याच्या इतिहासात न भुतो न भविष्यती अश्या रुग्ण सुविधा टप्या टप्याने निर्माण होत आहेत. मंत्री सावंत यांच्या आदेशानुसार भुम येथे 60 बेडचे स्वतंत्र स्त्री रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन भुम तालुक्यातील अंद्रूड येथे उपकेंद्र मंजूर करण्यात आले आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात खाटांची बेड संख्या 60 वरून 100 इतकी करण्यात आली आहे तर मोहा येथील प्राथमिक आरोग्य केंद्राचे श्रेणीवर्धन करुन 30 खाटाचे ग्रामीण रुग्णालय मंजुर करण्यात आले आहे. या आरोग्य सुविधा व निर्णयामुळे ग्रामीण भागातील रुग्णांची वैद्यकीय सोय होणार आहे.
भुम शहरात स्वतंत्र 60 बेडचे स्त्री रुग्णालय मंजुर करण्यात आले असुन बांधकाम पुर्ण झाल्यावर त्या ठिकाणी डॉक्टर व इतर वैद्यकीय स्टाफ याची पदनिर्मिती करण्यात येणार आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असुन त्याचे श्रेणीवर्धन करण्यात आले असुन तिथे 30 बेडचे ग्रामीण रुग्णालय होणार आहे. पालकमंत्री तथा आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी विशेष बाब म्हणून ग्रामीण रुग्णालय मंजुर केले आहे. कळंब येथील उपजिल्हा रुग्णालयात बेडची संख्या 60 वरून 100 इतकी करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणून श्रेणीवर्धन केले आहे. भुम तालुक्यातील अंद्रूड येथे उपकेंद्र विशेष बाब म्हणून मंजुर केले असुन जागा अधि केल्यानंतर बांधकाम पुर्ण झाल्यावर पदस्थापनेची कार्यवाही केली जाणार आहे.
सावंत हे मंत्री झाल्यापासून धाराशिव जिल्ह्यात अनेक आरोग्य संस्थांना श्रेणीवर्धन, मंजुरी, इमारत दुरुस्ती, मशीन व इतर साहित्य आधुनिकीकरण रूपाने बळकटी मिळाली आहे. धाराशिव येथे नवीन 500 खाटाचे जिल्हा रुग्णालय, कॅथ लॅब, फिरता दवाखाना, मिशन आनंदी, महिलांची व ज्येष्ठ नागरिकांची आरोग्य तपासणी तालुक्यासह महाआरोग्य शिबीर संपन्न झाली आहेत तसेच विविध शासकीय व नावीन्यपुर्ण योजनाची प्रभावी अंमलबजावणी झाली आहे.