धाराशिव – समय सारथी
नवरा, नणंद आणि मेहुण्याने डांबून ठेवून महिलेच्या भुवया काढून, मुंडन करून विद्रूपीकरण केल्याचा आरोप एका महिलेने केला आहे, त्रासाला कंटाळूने महिलेने माहेरी धाव घेतली आहे. हा प्रकार बार्शी येथे घडला असुन बार्शी शहर पोलीस स्टेशनमध्ये पिडीत महिलेने तशी तक्रारी ही दिली आहे, तक्रार दिल्यानंतर महिला तीच्या माहेरी धाराशिव जिल्ह्यातील एका गावात आली आहे.
9 मार्च रोजी महीलेस बार्शीतील घरी तिचा नवरा, मेहुना, नणंद,यांनी चारित्र्याचा संशय आणि कौटुंबिक वादातून घरात दहा दिवस डांबून ठेवल्याचा आरोप महिला करत असून नवऱ्याच्या तावडीतून सुटल्यानंतर महिला धाराशिव जिल्ह्यातील आपल्या माहेरी आली आहे. बार्शी पोलिसांकडून कोणतीही कारवाई केली जात नाही असे सांगून महिला तिच्या आईला घेऊन ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आली मात्र तक्रार बार्शी पोलिस स्टेशनमध्ये दिली असल्याने बार्शी पोलीस याचा तपास करू शकतात असे सांगून महिलेला आल्या पावली परत पाठवल्याने न्यायासाठी महिलेची भटकंती सुरू आहे.