14 लाखांपेक्षा अधिक वारकऱ्यांची तपासणी – आरोग्य मंत्री डॉ तानाजीराव सावंत
धाराशिव – समय सारथी
वारी ही महाराष्ट्राची ओळख व संस्कृतीक, संत परंपरा… आषाढीवारी निमित्त पांडुरंगाच्या दर्शनासाठी लाखों भाविक हे पंढरपुरला विविध दिंडीतुन पायी चालत येतात. पायी चालत येणाऱ्या वारकऱ्यांना आरोग्याच्या अनेक अडचणी येतात, विविध घटनात 120 वारकऱ्यांना हृदयविकाराचा झटका आला मात्र त्यांना वेळीच योग्य उपचार मिळाल्याने त्यांचे जीव वाचले. हार्ट अटॅकसह इतर गंभीर प्रकारात 1 हजार 270 रुग्णांवर तात्काळ उपचार केले गेले, आरोग्य विभाग हा यांच्यासाठी ‘देवदुत’ ठरला असुन पांडुरंगासारखा धावुन आला अशी प्रतिक्रिया वारकऱ्यांनी दिली. 46 वारकऱ्यांना सर्पदंश झाला मात्र त्याचे उपचाराने प्राण वाचले. राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हे अभियान राबविल्याने त्याचा वारकऱ्यांना फायदा झाला, यात जवळपास 14 लाख पेक्षा अधिक वारकऱ्यांची आरोग्य तपासणी झाली तर 5 लाख वारकऱ्यावर उपचार झाले.
आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी या अभियानाचे 2 रे वर्ष होते, वारी पुर्वी जवळपास 1 महिना आरोग्य मंत्री डॉ सावंत यांनी तयारी सुरु केली. रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा असे समजुन अथक परिश्रम केले, प्रत्येक 5 किलोमीटर अंतरावर एक आपला दवाखाना सुरु करण्यात आला. काही ठिकाणी आयसीयु अतिदक्षता विभाग व अद्यावत यंत्रणा उभी करण्यात आली त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्री सावंत व आरोग्य विभागाचे कौतुक केले. इथे तपासणी करण्यात आलेल्या वारकरी यांच्यावर त्या त्या जिल्ह्यात डॉ यांनी दाखवलेली चिट्ठी दाखवुन उपचार केले जाणार असल्याचे मंत्री डॉ सावंत यांनी सांगितले.
पंढरपूरच्या 4 ठिकाणी भव्य दिव्य मंडप उभारण्यात येणार असून जवळपास 6 हजार डॉक्टरांच्या मदतीने सर्व वारकऱ्यांची सेवा, आरोग्य तपासणी करण्यात आली यावेळी जवळपास 200 डॉक्टर डोळ्यांची तपासणी करण्यासाठी उपस्थित राहणार असून या माध्यमातून किमान पाच लाख वारकऱ्यांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले तर ज्या वारकऱ्यांची तपासणी झाली त्याचेवर उपचार सुद्धा केले जाणार आहेत.
थंडी, ताप, खोकला, पोटदुखी, सारी, रस्ते अपघात, कुत्रा व साप चावणे आदी घटनात वारकऱ्यांवर उपचार करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रातून सहाशे पेक्षा अधिक दिंड्यासोबत एक रुग्णवाहिका व एक फिरता दवाखाना सोबत ठेवण्यात आला. ब्लड प्रेशर तपासणी, शुगर तपासणी, महिलांसाठी गर्भाशयाच्या कॅन्सरची तपासणी अश्या जवळपास शंभर तपासण्या करण्यात आल्या, ते रिपोर्टनुसार शासकीय रुग्णालयात गरजेनुसार उपचार केले जाणार आहेत.
राज्याचे आरोग्यमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांना पंढरपूर येथील आषाढी वारीच्या व्यवस्थेकरीता व नियोजनासाठी समन्वयक मंत्री म्हणुन मुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी दिली, ती त्यांनी यशस्वी पार पाडली. मुख्यमंत्री शिंदे यांनी मंत्री सावंत यांनी केलेल्या नियोजन व उपाययोजनाबद्दल कौतुक केले. आरोग्याची वारी हा एक देशातील पथदर्शी उपक्रम असुन रेकॉर्ड ब्रेक तपासणी करण्यात आली.