धाराशिव – समय सारथी
तुळजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती विजय गंगणे यांनी तुळजापूर येथे काल एक पत्रकार परिषद आयोजित केली होती, त्यात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी व जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती त्या रायरेश्वर बाबत वादग्रस्त वक्तव्य केले आहे, ते वक्तव्य करताना त्यांनी इतिहासाचा दाखला दिला आहे. त्यांचे वक्तव्याचे 2 व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत असुन त्यावर संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.
एक जन असे सांगतोय की, छत्रपती शिवाजी महाराज आले आणि आई तुळजाभवानीला तलवार अर्पण केली. हे त्यांनी प्रूफ करावं, मी फासावर जायला तयार आहे. चार पुस्तके आणायची बघायचे विकायचे, काही उत्तर द्यायचं असे अजिबात चालणार नाही. जो इतिहास खरा आहे तो खरा आहे असा दावा विजय गंगणे यांनी करत तुळजाभवानी तलवार आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक संदर्भावर प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे. कोण, काय आणि कसला रायरेश्वर असेही ते म्हणाले.