ओमराजे यांचा बाप काढला ? औकात नाही, उपरे ? इथून पुढे त्यांचा थेट सामना – आमदार राणा दादा विकास रत्न
नकळत व्यसन जडले, पश्चाताप झाला अन टीप दिली – पत्रकाराना थेट धमकी, चार्जशीट मंगळवारी जाणार, दावा
धाराशिव – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात विजय गंगणे यांनी पत्रकार परिषद घेत खासदार ओमराजे, आमदार कैलास पाटील, पत्रकार, पोलीस यांच्यासह अन्य लोकांवर गंभीर आरोप केले. काही धक्कादायक खुलासे करीत कबुली देत त्यांनी हल्लाबोल केला. ड्रग्ज तस्करी व विजय गंगणे यांच्या आरोपाची उच्चस्तरीय किंवा न्यायालयीन यंत्रणामार्फत चौकशी होणे गरजेचे आहे, त्यासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी सत्ताधारी आमदार म्हणून जबाबदारी घेत पाठपुरावा करणे गरजेचे आहे. विनोद गंगणे यांनी तुळजापूर येथे शिष्टमंडळासह पत्रकार परिषद घेतली. ड्रग्ज सारख्या विषयात ‘तो’ षडयंत्रकारी व पेड न्यूज पत्रकारिता संस्कृतीचा जनक कोण? हेही समोर येणे गरजेचेच आहे. गंगणे यांच्या म्हण्याप्रमाणे ड्रग्जचे मुंबई पुढील व तुळजापूर येथील विक्री करणारे समोर येणे गरजेचे आहे.
तुळजापूर येथे ड्रग्ज प्रकरणात आरोपीना तुळजापूर येथील कोर्टात न नेता त्यांना धाराशिव येथे जिल्हा व सत्र न्यायालयात (सेशन) नेण्यात आले यावर आक्षेप घेत, ही सगळी प्रक्रिया कायदेबाह्य असल्याचा आरोप केला. ड्रग्ज हे कमरशियल प्रयोजनासाठी होते की इतर याची शहानिशा न करता कारवाई झाली. ज्या वेळी ड्रग्ज पकडले गेले त्यावेळी त्या ड्रग्जची किंमत, वजन कोणाला कळेना झाले होते. तुळजापूर येथे आलेले नेते, पुजारी मंडळ ज्यांना त्यांना असे वाटत आहे की आई तुळजाभवानची काळजी त्यांना आहे, एक पत्रकार निबंध लिहत असल्यासारखे रोज बातम्या देत आहे यावर त्यांनी आक्षेप घेतला. निवडणुकीत ज्यांना कधी विजय मिळाला नाही त्यांनी कारवाई झाल्यावर संधी साधली व सांगितले की याच्या मागे हा ‘आका’ आहे, तो आहे. आका शब्दाचा अर्थ तरी काय ? असा सवाल केला.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, अमोल कुतवळ, नागनाथ भाऊ भांजी, शाम पवार हे एकत्र आले व त्यांनी सांगितले की आमदार राणा दादा, विनोद पिटू गंगणे हे आका आहेत, षडयंत्र आहे, ते हुडकून काढा. पोलीस पोलिसांचे, न्यायाधीश यांचे काम करीत आहेत. या लोकांनी उठाव केला त्यानंतर पुजारी मंडळ यांनी विरोध केला हे चांगले आहे. वाईट प्रवृत्तीला आपल्याला नष्ट करायचे आहे, केवळ ड्रग्ज हे वाईट नसुन दारू, गांजा, आफिम,वेश्या व्यवसाय याला संपवायचे आहे असा प्रण त्यांनी केला. आम्ही 50 रुपयापासून भक्तांच्या पुजा घातल्या आहेत, गरिबीत दिवस काढले आहेत, आमच्या कर्तृत्वाने आम्ही कमावले आहे, असे म्हणत त्यांनी स्वतःच्या प्रगतीचा मार्ग सांगितला.
मला पोलिसांची नोटीस आली होती, त्यात मी कबुल केले की माझा भाऊ व्यसनी होता. सर्व कागदपत्रेसहित मी पोलिसांना माहिती, पुरावे प्रामाणिकपणे सांगितली, याला आत्मसमर्पण करणे असे म्हणतात. पिटू गंगणे याच्या परिवाराचा, त्यांच्या भावनाचा विचार करा, एकाला यात अडकवू नका. आम्ही राणा दादाच्या माध्यमातून तुळजापूर सुजलाम सुफलाम करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याना बदनाम करू नका. तो अब्ज करोडपती माणुस, हात जोडून विनंती आहे यात दादाना बदनामी करू नका असे गंगणे म्हणाले. पुजारी बदनामी बातम्या थांबल्या नाहीत तर एका पत्रकाराला त्याच्यावर शिंतोडे उडवत नागवे केलेल्या शिवाय राहणार नाही असा इशारा धमकी या पत्रकार परिषदेत दिली, बातम्या करू नये म्हणुन हे सगळे सुरु आहे.
शून्यातून जग निर्माण केलेल्या राजावर शिंतोडे उडतात तसे मुंबई, पुणे येथील परिवारात फिरत असताना चूक झाली व नकळत विनोद गंगणे यांना व्यसन लागले, त्यानंतर आम्ही आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्याकडे गेलो व त्यांना सांगितले की असे झाले आहे. उपचार घ्या, आम्ही सोलापूर येथे जाऊन उपचार घेतले, त्यानंतर राणा दादा यांनी तेरणा मेडिकल कॉलेज येथे पाठवले. तिथे तज्ज्ञ डॉक्टर यांनी सांगितले की पिटू भय्या यांना बडोदा किंवा पुणे येथे व्यसनमुक्ती केंद्रात घेऊन जा असे सांगितले, त्यानंतर आम्ही पुणे येथे गेलो मात्र ते आम्हाला आवडले नाही, नंतर बडोदा येथे गेलो तिथे आढळून आले की त्यांच्या शरीरात अमली पदार्थ व्यसन आहे, तिथे 2 महिना उपचार घेतल्यावर त्यांना बरे वाटले. त्यानंतर त्यांना पश्चाताप वाटला आपले चुकले, नगराध्यक्ष असे करीत आहेत. 9 वी 10 वीच्या लहान मुलांना सहज पैसा मिळाला व ते मिळाले त्यावेळी त्यांना वाटले की याचे उच्चाटन करायचे आहे. मला झाले म्हणुन इतरांना होऊ नये म्हणुन त्यांनी 2 वेळेस माहिती दिली मात्र ट्रॅप अयशस्वी गेला. आका व बोका असे काही नाही मात्र काँग्रेस, ठाकरे गट व इतरांनी राजकारण केले.
मटका तुळजापूर येथे खुप जास्त फोफावला असुन दारू, वेश्या व्यवसाय पण आहे त्यावर या लोकांनी काय केले, पुजारी मंडळ त्यानंतर आले. चार्जशीट मंगळवारी किंवा दाखल झाले असेल असा दावा त्यांनी केला आहे. गुन्हा नोंद झाल्यावर लग्न जमत नाहीत असे ते म्हणत आहेत मात्र लग्न जमत आहेत. चार चांडाळ चौकडी व धाराशिव येथील एक पत्रकार यांचे हे षडयंत्र काम करीत आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांचा ऐकेरी उल्लेख करीत अरे ओमा आम्ही आमचं तुळजापूरच आम्ही बघून घेऊ की ? तुझं त्यात काय? तुला काय माहित? तु दोन्ही कडून वाजवतोस? चीत तुझं पट तुझं? तुम्ही संसदेत आवाज उठवात मग मुंबईच्या पुढे ड्रग्ज तस्करीत का गेला नाहीत. डीलरच्या पुढे कोणीतरी असेल ना मग तिथे का नाही पोहचलात. संगीताने कुठून तरी ड्रग्ज आणले असेल ना त्यावर ओमराजे का बोलले नाहीत. तुळजापूरच्या लोकांना बदनाम करण्यासाठी ओमराजे यांनी आवाज उठवला आहे.
ओमराजे हे कैलास पाटील यांना सांगतात व ते सांगतात विशाल छत्रे याचे नाव घ्या, तुळजापूर मध्ये तुमचं काय काम आहे. हमारे अंगणे मे तुम्हारा क्या काम हैं असे म्हणत विजय गंगणे यांनी हल्लाबोल केला. आमदार खासदार यांनी काही केले नाही त्यांनी फक्त भांडण लावायचे काम केले आहे. हे आताच्या आत थांबवा असे सांगत त्यांनी इशारा दिला. शिर्डी येथे ड्रग्ज घेऊन 2 लोकांची हत्या झाली मात्र त्यावर चर्चा झाली नाही कारण तीर्थक्षेत्र म्हणुन बदनामी नको आहे. पंढरपुरला गांजा सापडला तिथले नाव आले का? राज्यातील प्रत्येक ठिकाणी हा प्रकार सुरु आहे मात्र इथे एकाला दोषी ठरवून उध्वस्त केले जात आहे. कुतवळ हा पिटू गंगणे याला सोलापूर येथे भेटला व आईसक्रीम खाल्ले व नंतर निवेदन दिले व धाराशिव येथे रोमा हॉटेल येथे एका पत्रकारला मॅनेज होण्यासाठी भेटला का? असा सवाल केला. यानिमित्ताने पिटू गंगणे, मध्यस्थी व संबंधित याची आमने सामने चौकशी होणे गरजेचे आहे.
ओमा तुला इतिहास, भूगोल माहिती नाही आणि बोंबोलतोस की मी खासदार आहेस. अपघाताने तु खासदार झालास, इथून पुढे तु आणि मी असा थेट सामना असेल, पाहुयात असा गर्भीत इशारा दिला. मंदीर व पुजारी यांच्या कल्याणसाठी हजारो कोटी ररुपयाचा निधी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आणला, ते धडपड करीत आहेत त्यांना बदनाम केले जात आहे. आपली पायरी ओळखावी, आपल्याला इतिहास, भूगोल माहिती आहे का ?
ओमराजे म्हणतात कर्म कर्म.. तुझा बाप दुधवाला होता, तु दुधवाला आहे. तु एकनिष्ठ नाहीस, तुला निष्ठावान याची व्याख्या माहिती नाही. राणा दादावर कोणी आक्षेप घेऊ नका. तुळजापूरकरांना विनंती आहे की, खरा गुन्हेगार याला फासावर लटकावा, शिक्षा द्या आमचं काही मत नाही मात्र तुळजाभवानी मंदीर, शहर याची बदनामी करू नका. सर्वांची इज्जत तुमच्या हातात आहे. राणा दादा यांची तुळजापूर विषयी आत्मा जुडलेली आहे त्यांना बदनाम करू नका असे आवाहन केले. दोन दोन हजार कोटी रुपये घेऊन राणा दादा येत आहेत. प्रसाद योजनेला ओमराजे खिळ बसवीत आहेत.ओमराजे साडेसाती असे म्हणत आहेत मात्र संगीता गोळेच्या पुढचे कोण हे का बोलत नाहीत.
षडयंत्र नुसते नाव झाले त्याला प्रपंच करावा लागतो. षडयंत्र 6 प्रकारचे असतात त्यामुळे त्यांना ते जमत नाही म्हणुन त्याला षडयंत्र म्हणू नका, 6 प्रकारचे प्रपंच केल्यावर एक षडयंत्र तयार होते. कधी तुळजापूरची सत्ता येते याची ते वाट पाहत आहेत. पराभूत उमेदवार धीरज पाटील अस्वस्थ झाले आहेत, एक तर ते गावाचे नाहीत, त्यांचा उंबरठा कोणी बघितला नाही. ओमराजे आणखी 4 वर्ष खासदार आहेत, त्यांनी केंद्रीय गृहमंत्री आमित शहा यांच्या सोबत बसून संगीता गोळे याच्या पुढची ड्रग्ज लिंक त्यांनी काढुन दाखवावी असे जाहीर आव्हान विजय गंगणे यांनी ओमराजे यांना दिले.
ड्रग्ज प्रकरणाची पोलखोल करणारा एक तर पोलिसांचा खबऱ्या असावा किंवा समाजसेवक आहे. या व्यतिरिक्त कोणीही नाही. सर्वपक्षाच्या लोकांनी एकत्र येऊन तुळजापूरची बदनामी थांबवावी. दारू, मटका, वेश्या व्यवसाय हे तुळजापूर येथून कायम बंद झाले पाहिजे, आमची तयारी आहे, आम्ही ठराव घेतला आहे मात्र त्यांना विचारा त्यांची तयारी आहे का? धीरज पाटील व चांडाळ चौकडीने कधी लोकांना मदत केली का? चार पैसे कोणाला दिले काय. जो पर्यंत न्यायालय दोषी ठरवत नाही तोपर्यंत तो संशयित असतो त्याला दोषी ठरवू नका. अनेक प्रकरणात कोर्टाने अनेकांना निर्दोष ठरवले आहे आम्ही वर्षभर चांगले कार्य करतो म्हणुन हा आमच्यावर अन्याय का, षडयंत्र का असा सवाल केला.