धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील निवडणुक विभाग व जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली असुन धाराशिव-कळंब, भुम परंडा वाशी, उमरगा लोहारा व तुळजापूर या 4 विधानसभा मतदार केंद्रातील मतदान केंद्राची यादी अंतीम करण्यात आली आहे. 4 विधानसभा मतदार संघात 1 हजार 523 मतदान केंद्र असणार आहेत, यासाठी छत्रपती संभाजीनगर व हिंगोली या 2 जिल्ह्यातुन ईव्हीएम, कंट्रोल युनिट व व्हीव्हीपॅट मशीन येणार आहेत. जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे, उप जिल्हा निवडणुक अधिकारी शिरीष यादव यांच्या मार्गदर्शनाखाली निवडणूक यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली आहे.
उस्मानाबाद विधानसभा मतदार संघात 416, परंडा 376, तुळजापूर 410 व उमरगा विधानसभा मतदार संघात 321 मतदान केंद्र असणार आहेत. पुर्वीचे 1 हजार 503 व नवीन 20 असे एकूण 1 हजार 523 मतदान केंद्र असणार आहेत.
विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रथम स्तरीय ईव्हीएम व इतर मशीनची तपासणी एक ऑगस्ट पासून सुरू करण्यात येणार असून त्यासाठी प्रशासनाने तयारी सुरु केली आहे. मतदार यादीची दुरुस्ती, नवीन नावे नोंदणी व वगळलेल्या नावांचा समावेश, पत्ता व इतर बदल अशी मोहीम सुरु आहे.