धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या नवरात्र उत्सवात आता कुंकवाऐवजी आता फुलांची उधळण केली जाणार आहे, तुळजाभवानी मंदीर संस्थानने हा निर्णय नवरात्र उत्सवासाठी आयोजित केलेल्या बैठकीत घेतला आहे. या बैठकीला महंत, पुजारी उपस्थितीत होते. जिथे आवश्यक आहे तिथे देवीच्या धार्मिक विधी व कार्यावेळी कुंकू व गुलाल वापरला जाणार आहे त्यामुळे कोणतीही प्रथा मोडली जाणार नाही. अनेक वेळा भाविक व पुजारी एकमेकांवर कुंकवाची मोठ्या प्रमाणात उधळण करतात त्यामुळे भाविकांच्या डोळ्यात कुंकू जाऊन त्रास होतो त्यामुळे आता फुलांची उधळण करण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची अंमलबजावणी कशी करायची यासाठी आगामी काळात नियोजन बैठक घेतली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सांगितले.
तुळजाभवानी देवीच्या महत्वाच्या वार्षिक उत्सवापैकी एक शाकंभरी नवरात्र उत्सव असुन त्याची तयारी सुरु आहे, या उत्सवात सिमोउल्लंघन दसरा वेळी देवीची मुळ अष्टभुजामुर्ती पालखीत ठेवुन मंदिराभोवती प्रदक्षिणा मारली जाते यावेळी लाखों भाविक तुळजाभवानी मंदिरात येतात. या उत्सवात कुंकवाची उधळण मोठ्या प्रमाणात केली जाते मात्र आता धार्मिक विधी वगळता अन्य ठिकाणी फुलांचा वापर केला जाणार आहे. तुळजाभवानी देवीचा नवरात्र उत्सव अवघ्या काही दिवसांवर आला असुन भविकांच्या सोयी सुविधाना मंदीर संस्थानने प्राधान्य दिले आहे.