उद्धव ठाकरे यांचा सरकारवर हल्लाबोल – विमा कंपनी विरोधात मोर्चा काढणार, तर शेतकरी सिंहासन खाक करेल
धाराशिव – समय सारथी
चोर तो चोर अन चोराच्या उलट्या बोंबा अशी सरकारची स्तिथी आहे, हे सरकार चोर आहे. मी थेट लोकात जाऊन बोलत आहे. मी राजकारण करायला आलो नाही, शेतकरी यांना न्याय दयायला आलो आहे. सरकार फसवणूक करीत आहे, हे इतिहासातील सर्वात मोठे पॅकेज नसुन सर्वात मोठी थाप आहे. जमीन खरडून गेली तरी पैसे मिळाले नाही, पॅकेज मोठे जाहीर केले मात्र पैसे दिले नाहीत, पॅकेजला भोक काय भोक पडली काय असा सवाल उद्धव ठाकरे यांनी सरकारला केला. सरकार दगाबाज असुन दगाबाजाशी दगाबाजी केली पाहिजे.मी जेव्हा हाक देईल तेव्हा साथ देत रस्त्यावर उतरा. 15 दिवसात पीक विम्याची नुकसान भरपाई नाही मिळाली तर विमा कंपनीवर मोर्चा काढण्याचा इशारा दिला.
दगाबाज सरकारशी दगाबाजी करायला हवी. आधी कर्जमाफी मगच मत देऊ असे बोर्ड गावागावात लावा. कर्जमुक्ती नाही तर सरकारला मत नाही असे बोर्ड लावा, असे केले तरच सरकार गुडघ्यावर येईल, बोर्ड लावून सरकारला विरोध करण्याचा निश्चय करा, शिवसेना तुमच्या सोबत आहे असे ते उद्धव ठाकरे म्हणाले. केंद्राचे पथक आले आहे, ते रात्रीचे टॉर्च घेऊन रात्री फिरत आहेत. केंद्राचे पथक दाखवा, 100 रुये मिळवा असे बॅनर गावोगावी लावा. शेतकरी शांत आहे मात्र तो नामर्द नाही त्याला पेटवू नका तो पेटला तर तुमचे सिंहासन खाक करून टाकेल असे ते म्हणाले.
दगाबाज रे..सरकार पॅकेजचे काय झाले असे म्हणत शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील भुम तालुक्यातील पाथरुड येथील ग्रामस्थ यांच्याशी संवाद साधला व प्रत्यक्ष मदत मिळाली की नाही याचा पंचनामा केला. अतिवृष्टी झाल्यावर उद्धव ठाकरे यांनी भुम परंडा वाशी या भागाचा पाहणी दौरा केला होता, त्यानंतर सरकारने दिलेली मदत मिळाली की नाही हे त्यांनी शेतकरी यांना विचारले.
यावेळी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर, माजी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे, शिवसेना नेते चंद्रकांत खैरे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, जिल्हा प्रमुख रणजित पाटील यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थितीत होते. धाराशिव जिल्ह्यात अतिवृष्टीने शेतकरी यांचे मोठे नुकसान झाले असुन शेती, शेतजमीन, जनावरे यांचे मोठे नुकसान झाले आहे.
सरकारला लाज वाटत नाही नका असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी निकृष्ट धान्य हातात धान्य घेऊन लोकांना दाखवले. हे अन्न शेतकरी अन्नदात्याला खायला देता काय? हा कुठला न्याय. मी बोलायला नाही तर बोलते करायला आलो आहे. निवडणुका आहेत म्हणून आलो आहे असे विरोधक आरोप करीत आहेत. इथे शेतकरी संकटात आहे म्हणुन आलो आहे. आपत्ती, पाऊस यांना स्थगिती देता येते का ? शेतकरी उध्वस्त झाला आहे असे ते म्हणाले.
पीक विम्याचे पैसे मिळाले नाहीत, 2-3 रुपये असा विमा मिळाले आहेत, विमा भरताना जी रक्कम भरली ती सुद्धा मिळाली नाही. विमा कंपनीवरती मागे मोर्चा काढला होता, तसा मोर्चा काढावा लागेल. शेतकरी यांची ही फसवणूक असुन थट्टा आहे, पीक विम्याच्या पावत्या शेतकरी यांच्याकडुन गोळा करा, 15 दिवसात नुकसान भरपाई कंपनी यांनी दिली नाही तर मोर्चा काढण्याचा इशारा दिला. पंतप्रधान फसल विमा योजना असे नाव आहे नावातच फसल आहे आणि शेतकरी फसलात असे ते म्हणाले.
शिवभोजन बंद आहे, दिवाळीत नागरिकांना आनंदाचा शिधा दिला नाही. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कुठे आहेत, इथे शेतकरी उघड्यावर पडला आहे आणि ते बिहारला निवडणुकीत गेले आहेत. कैसल बा असे म्हणत ते बिहारमध्ये गेले. मुख्यमंत्री अंदर की बात म्हणुन सांगतात की, बिहारवर पंतप्रधान यांचे जास्त प्रेम आहे. असले सरकार हवे आहे का? असा सवाल ठाकरे यांनी केला.
एकरी 50 हजार रुपये मिळाले पाहिजेत, आता शेतकरी यांना कर्जमाफी गरज आहे मात्र हे म्हणतात जुन महिन्यात देऊ, त्यामुळे आता तात्काळ कर्जमाफी द्या. रब्बी हंगामात पैसे लागतील. शेतकरी पैसे जमा करण्यासाठी हात पाय हलवातील आहे, तुम्ही काय कागदपत्रे हलवायचे ते हलवा पण मदत द्या.
कर्जमाफीबरोबर हमी भाव द्या, त्यांना मेहनतीचा दाम द्या, शेतकरी भिकारी नसुन तुमच्या दारात भीक मागायला आला नाही. हमी भाव दिला तर ते संकटातुन बाहेर येतील. तुमचे 50 खोके नको, त्यांना हमी भाव मिळाला पाहिजे म्हणुन आम्ही रस्त्यावर उतरललो आहे.
निवडणुका व सरकार येतील जातील मात्र शेतकरी यांना मदत करणारे, त्याची जाण असणारे सरकार हवे, आम्ही संकटात सोबत आहोत असे ठाकरे म्हणाले.
जिल्हा परिषद निवडणुका आहेत म्हणुन हे सुरु आहे असा आरोप विरोध करीत आहेत. केला जात आहे मात्र कोणतीही निवडणुक नसताना उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी कोणतीही निवडणुक नसताना शेतकरी यांची सरसकट कर्जमाफी केली. लाडकी बहीण, कर्जमुक्ती दिली नाही शिवाय आनंदाचा शिधा सरकारने दिवाळीत दिला नाही असे, खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.
अनिल गोरे शेतकरी म्हणाले की, या भागातील 70 टक्के लोकांना मदत मिळाली नाही, फार्मर आयडी असतानाही शेतकरी यांना मदत दिली जात नाही असे ते म्हणाले. सरकार मुर्खात काढत आहे, पंजाबच्या शेतकरी पेक्षा जास्त मदत दिली असे म्हणाले मात्र 2-3 हजार पेक्षा जास्त मदत मिळाली नाही, असे म्हणत त्यांनी ठाकरे यांना कागदपत्रे व औरावे दिले. सोयाबीन,कांदा तूर ही या भागातील पिके आहेत उतारा कमी असल्याने पेरणीचे पैसे सुद्धा निघाले नाहीत, आम्ही जगाचे कसे असा प्रश्न उपास्थीत केला. कांदा हा बाजारात 10 रुपये किलो दराने जात आहे, दर वाढले नाहीत. आम्हाला शेतातील माती विकायची परिस्थितीती आली आहे. दुधाचे दर सुद्धा मिळत नाहीत, दुधात भेसळ केली जात आहे ती थांबावावी अशी व्यथा शेतकरी यांनी मांडली. शाळेतील अंगणवाडी मधील लहान मुलांना निकृष्ट दर्जाचे अन्न दिले जाते असे म्हणत त्यांनी धान्य दाखवले. हे अन्न जनावरे सुद्धा खात नाहीत असे म्हणत गोरे यांनी धान्य उद्धव ठाकरे यांना दाखवले.












