धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरातील ड्रग्ज तस्करीचे मुळ शोधून या प्रकरणाची निष्पक्ष व सक्षम यंत्रणेकडुन चौकशी व्हावी. शहरातील वाढलेल्या चोऱ्या, दरोडे याच्यावर कारवाई करावी.अवैध धंदे यांना पाठीशी घालणाऱ्या अधिकारी, कर्मचारी यांच्यावर करावी या मागणीसह पुजारी मंडळाच्या अध्यक्षाना दिलेल्या धमकीच्या निषेधार्थ 21 फेब्रुवारी रोजी शुक्रवारी सकाळी 10.30 वाजता एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण करण्यात येणार आहे. तहसील कार्यालयासमोर आंदोलन करुन ड्रग्जला पाठीशी घालणाऱ्या विरोधात तुळजापुरकर आक्रमक भुमिका घेणार आहेत. तुळजाभवानी पुजारी मंडळ व शहरवासियाच्या वतीने ह्या उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात 5 आरोपी असुन त्यातील 3 जणांना अटक केली आहे तर 2 जण फरार आहेत.