धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथे नगर परिषद निकालाच्या आधीच भाजप नगराध्यक्ष पदाचे उमेदवार विनोद पिटू भाई गंगणे व महाविकास आघाडीचे उमेदवार अमर मगर यांचे बंधू ऋषी मगर यांच्यात वाद झाला आहे. या हाणामारीत कुलदीप मगर हे गंभीर रित्या जखमी झाले असुन त्याच्या डोक्यात कोयत्याने वार करण्यात आले असुन सोलापूर येथे उपचारासाठी नेण्यात आले आहे. तर दिग्विजय पाटील यांना सुद्धा कोयता लागल्याने जखम झाली आहे.
गोलाई चौकातील पंचायत समिती येथील रस्त्याच्या कामावरून हा वाद झाला असुन त्यानंतर दोन्ही गटातील कार्यकर्ते भिडले. वादामुळे रस्त्यावरील ट्राफिक खोळबली. या राड्यात काही जन हातात कोयते, घातक शस्त्र घेऊन जातानाचा व गोंधळ घालतानाचा एक व्हिडिओ व्हायरल झाला असुन बंदुकीच्या 2 गोळ्या हवेत झाडून दहशत निर्माण करण्यात आल्याची माहिती काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांनी दैनिक समय सारथीशी बोलताना दिली. गोळीबारातील एक पुंगळी घटनास्थळी सापडली आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी ऍड मंजुषा ताई मगर यांनी केली आहे.
पोलिस कोयता गँगमधील लोकांचा शोध घेत असुन कायदा व सुव्यवस्था स्तिथी निर्माण झाली असल्याने बंदोबस्त वाढवला आहे.












