बार्शी पोलिसांच्या संपर्कात त्यांना सर्वोतोपरी मदत – पोलिस अधीक्षक संजय जाधव
धाराशिव – समय सारथी
तुळजापुर ड्रग्ज तस्करीत पुरवणी चार्जशीट दाखल होणार असुन फरार 22 आरोपीना अटक करण्याचे प्रयत्न सुरु असल्याची माहिती पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली. बार्शी येथे ड्रग्ज सापडले असुन त्यात 8 आरोपी परंडा येथील आहेत. धाराशिव पोलिस बार्शी पोलिसांच्या संपर्कात असुन त्यांना सर्वोतोपरी मदत केली जात असल्याचे जाधव म्हणाले.
तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणात कठोर पद्धतीने, सर्व बारकावे रेकॉर्डवर घेऊन तपास झालेला आहे. इथून पुढे ज्या ज्या गोष्टी तपासात निष्पन्न होतील त्या पुरवणी दोषारोप पत्रात समाविष्ट केल्यावर जातील. कुठलीही त्रुट राहणार नाही याची दक्षता आतापर्यंत घेतली आहे आणि यापुढेही घेतली जाणार आहे. आरोपीना अटक करण्याचे प्रयत्न सुरु आहेत असेही पोलिस अधीक्षक संजय जाधव म्हणाले.
माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद रामकृष्ण जमदडे,तस्कर इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर, मुंबई येथील वैभव गोळे, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक काकासाहेब शिंदे,अभिजीत गव्हाड, तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे सर्व 22 आरोपी फरार असुन पोलिस त्यांचा शोध घेत आहेत.
बार्शी येथील ड्रग्ज तस्करीत परंडा येथील आरोपी सापडले आहेत, सोलापूर पोलिसांना जी जी मदत मागेल, माहिती देत असुन समन्व्यने काम सुरु आहे. त्यांना जे जे लागेल ती सर्व मदत धाराशिव पोलिस करणार आहे. बार्शी येथील अधिकारी यांच्याशी आम्ही संपर्क ठेवुन आहोत त्यांना नागरिकांनी दिलेली माहिती दिली आहे. परंडा येथील असद हसन देहलुज, मेहफुज महंमद शेख, वसिम इसाक बेग, जावेद नवाबमुद्दीन मुजावर, हसन चाऊस हे 5 आरोपी असुन परंडा येथील उर्वरीत 3 नावे पोलिसांनी गोपनीय ठेवली आहेत. बार्शी येथील जमीर अन्सार पटेल व सिरफराज उर्फ गोल्डी अस्लम शेख या 2 जणांचा समावेश आहे