धाराशिव – समय सारथी
तुळजापूर शहरात ड्रग्ज विक्री सुरु असल्याचा गंभीर आरोप तुळजापूर येथील सामाजिक कार्यकर्ते रवींद्र ज्ञानोबा साळुंके यांनी केला असुन त्याबाबत त्यांनी जिल्हाधिकारी यांना लेखी निवेदन दिले आहे. साळुंके यांनी दिलेल्या निवेदनात गंभीर आरोप करण्यात आले असुन त्यातील तथ्य समोर येण्यासाठी चौकशी होणार का हे पाहावे लागेल.
साळुंके यांनी दिलेल्या निवेदनानुसार तुळजापूर शहरात लोहारा मार्गे ड्रग्ज येत आहे. प्रशासन कोणाला तरी वाचवण्याचा प्रयत्न करीत आहे का ? असा सवाल साळुंके यांनी केला असुन ड्रग्जला आळा घालावा अशी मागणी केली आहे.
14 फेब्रुवारी 2025 रोजी धाराशिव पोलिसांनी मोठी कारवाई करीत ड्रग्जसह आरोपी रंगेहात पकडले त्यानंतर तपासात तब्बल 38 आरोपी निष्पन्न झाले त्यातील 35 जणांना अटक केलीना, त्यात सोलापूर, मुंबई येथील आरोपीचा समावेश होता. माजी सभापती पुत्र विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, माजी उपसभापती शरद जमदाडे, माजी नगराध्यक्ष संतोष कदम परमेश्वर उर्फ मेंबर, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू भाई गंगणे यांच्यासह अन्य आरोपी होते.
ड्रग्ज गुन्ह्यातील काही आरोपी जामीनावर बाहेर आले असुन त्यांना काही अटीसह जामीन मंजुर केला आहे तर मुंबई येथील मुख्य तस्कर वैभव गोळे, इंद्रजीतसिंह उर्फ मिटू ठाकुर यासह अन्य एक असे 3 आरोपी फरार आहेत. पोलीसांनी 10 हजार 744 पानाचे दोषारोप पत्र 16 एप्रिल रोजी धाराशिव जिल्हा न्यायालयात दाखल केले असुन तपास सुरु असुन पुरवणी दोषारोप दाखल केले नाही.
तुळजापूर येथे ड्रग्जवरून मोठी कारवाई झाली. साळुंके यांनी केलेले आरोप गंभीर असुन त्यात तथ्य असेल तर ती एक मोठी गंभीर बाब असणार आहे, त्यांनी केलेल्या आरोपांची चौकशी होणे गरजेचे आहे.












