धाराशिव – समय सारथी
तुळजापूर येथील ड्रग्ज तस्करांवर कडक कारवाई करुन त्यांना अटक करावे अन्यथा तुळजापूरकर वासियाकडुन मोठे जनआंदोलन केले जाईल असा निर्णय तुळजापूर येथे झालेल्या बैठकीत घेण्यात आला, बैठकीनंतर उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख यांना निवेदन देण्यात आले त्या निवेदनात अनेक गंभीर आरोप करण्यात आले. ड्रग्ज प्रकरणी कारवाई होत असली तरी आजही मोठ्या प्रमाणात ड्रग्जची खरेदी विक्री सुरु आहे, या धंद्याचा मुळ विक्रेता, सुत्रधार मोकाट आहे. पोलिसांनी गोपनीय नावे ठेवलेल्या त्या 4 आरोपीना अटक करा व यातील सर्वावर मकोका लावा अशी मागणी करण्यात आली.

काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील,माजी नगरसेवक नागनाथ भाऊ भांजी, शिवसेना जिल्हा संपर्क प्रमुख अमर राजे कदम, शाम पवार, हृषीकेश मगर,अमोल कुतवळ, विजय भोसले, जनहित संघटनेचे अजय साळुंके, राहुल खपले, महेश चोपदार, राजू भोसले,अक्षय कदम परमेश्वर, लक्ष्मण ननवरे,बालाजी जाधव,बापूसाहेब भोसले,वैजिनाथ पुजारी, उत्तम अमृतराव यांच्यासह इतरांच्या सह्या आहेत.
ड्रग्ज प्रकरणात 16 आरोपी असुन त्यातील 6 जण जेलमध्ये आहेत, 4 जण पोलिस कोठडीत तर 2 जण फरार व 4 नावे गोपनीय आहेत. ड्रग्ज तस्करीचा ‘आका’ व ‘बोका’ कोण हे अद्याप समोर आले नसुन त्यांना अटक करा अशी तुळजापूर यांची मागणी असुन पोलिसांनी गोपनीय नावे ठेवलेले ते 4 आरोपी कोण ? त्यांना अटक कधी करणार ? हा प्रश्न आहे. ‘आका’ व बोकाने तरुण पिढीला पोखरून टाकले आहे आणि हे जेलमध्ये जाईपर्यंत ही लढाई सुरू आहे असा विश्वास यावेळी बैठकीत व्यक्त केला. ड्रग्जमुळे पालक धास्तावले असुन भावी पिढी विषयी चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी कारवाई करावी अशी मागणी केली आहे.