धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी देवीच्या तुळजापुरात गेल्या 3 वर्षांपासुन ड्रग्ज तस्करी सुरु असल्याचे पोलीस तपासात उघड झाले असुन या गुन्ह्यात पोलिसांनी तब्बल 35 जणांना आरोपी केले आहे. 21 आरोपी फरार असुन 10 जण जेलमध्ये आहेत तर 4 जण फरार आहेत. तस्करी रॅकेटमध्ये सीडीआर, बँक आर्थिक व्यवहार यासह अन्य तांत्रिक बाबी असुन पोलीस त्यांचे विश्लेषण करीत आहेत. तस्कर व आरोपीचे गेल्या 3 वर्षातील बँक, कॉल डिटेल तपासले जात असुन त्याआधारे आरोपीचे वर्गीकरण व उपलब्ध पुराव्यांची साखळी जोडली जाणार आहे. तस्कर, पेडलर, सेवन करणारे यासह प्रोसेसर, फायनान्सर, कमावलेला पैसा गुंतवणारे अशी विभागणी केली जाणार आहे. मुंबई येथील 3 जणांसह तुळजापूर येथील काही जण मुख्य भूमिकेत आहेत, मुबंईतील लिंक अजुन समोर आली नाही. तस्करीची मुंबई व सोलापूर लिंकही यानिमित्ताने वेगळी सापडणार आहे.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील व ‘खबऱ्या’ भाईच्या ‘टीप’ मुळे कारवाई झाली, पोलिसांकडे कोणतीही ठोस माहिती नव्हती पण मी दिल्याने यश आले असे आमदार जाहीर म्हणतात. पोलिसांनी ‘भाई’ ला आरोपी केले असले तरी त्याला सेवन करणारा ‘पिडीत’ करणार की ‘म्होरक्या’ हे पहावे लागेल, या निमित्ताने आरोपीचे ‘गट’ पडणार आहेत. दरम्यान नोटीससत्र व कारवाईच्या भीतीने अनेक जण ‘नॉट रिचेबल’ झाले आहेत. मुंबईतील गोळे परिवार, माजी नगराध्यक्ष चंद्रकांत उर्फ बापु कणे, विनोद उर्फ पिटू विलास गंगणे, माजी सभापती शरद जमदडे, विश्वनाथ उर्फ पिंटू मुळे, इंद्रजीतसिंग उर्फ मिटू रणजीतसिंह ठाकुर हे ‘मानाचे’ 5 आरोपी कोणत्या गटात टाकले जातात हे पुराव्यावरून ठरणार आहे. पोलिसांसाठी ही तारेवरची कसरत असणार आहे, दोषारोपपत्राअंती हे स्पष्ट होणार आहे. गुन्ह्यात ज्याचा जसा सहभाग तसे आरोप व दोषी आढळ्यास त्या प्रमाणे शिक्षा केली जाते.
दुसऱ्या फळीतील अमित उर्फ चिमू अशोकराव आरगडे व युवराज देविदास दळवी आणि नळदुर्ग येथील संदीप संजय राठोड, प्रसाद उर्फ गोटन कदम परमेश्वर, उदय शेटे, आबासाहेब गणराज पवार, अलोक शिंदे,अभिजीत गव्हाड, मुंबई येथील संतोष खोत व तुळजापूर येथील स्वराज उर्फ पिनू तेलंग, विनायक इंगळे,शाम भोसले,संदीप टोले,जगदीश पाटील,विशाल सोंजी, अभिजीत अमृतराव,दुर्गेश पवार,रणजित पाटील,नाना खुराडे व सोलापुर जिल्ह्यातील उपळाई येथील अर्जुन हजारे हे पुरावे नुसार त्या त्या वर्गात जाणार आहेत. काही राजकीय पक्षाशी व व्यक्तीशी संबंधित आरोपी असले तरी ते उघड झाल्याने ड्रग्ज तस्करीची कीड नष्ट होईल अशी आशा आहे.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी बैठक घेत कारवाईचे आदेश दिले. खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील यांनी ड्रग्ज प्रकरणी संसद, विधीमंडळात आवाज उठवला. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी 3 वेळेस ड्रग्ज तस्करीबाबत लागणारी माहिती, टीप पोलिसांना दिली त्यामुळे तुळजापुरात वाढत असलेल्या ड्रग्ज रॅकेटचा भांडाफोड झाला. पोलिस अधीक्षक संजय जाधव व अपर पोलीस अधीक्षक शफकत आमना मॅडम, तत्कालीन अपर पोलिस अधीक्षक गौहर हसन, उपविभागीय अधिकारी डॉ निलेश देशमुख हे स्वतः यावर लक्ष ठेवुन आहेत. जिल्हा सरकारी वकील ऍड महेंद्र देशमुख हे सरकारच्या वतीने कोर्टात सक्षम बाजु मांडत आहेत. तामलवाडी पोलिस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे तपास करीत आहेत.