धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजापूर येथे 1 हजार 866 कोटी रुपयाचा विकास आराखडा मंजुर करून भरघोस विकास निधी महायुती शासनाच्या वतीने उपलब्ध करून दिल्याबद्दल भव्य नागरी सत्कार सोहळा ठेवण्यात आला आहे. महसुलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मित्रचे उपाध्यक्ष तथा आमदार राणाजगजीतसिंह पाटील यासह पालकमंत्री प्रतापराव सरनाईक, ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा सत्कार करण्यात येणार आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी विकास आराखडा व विकास निधी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला आहे, ही कामे आगामी 3 वर्षात पुर्ण केली जाणार आहेत.
हा सत्कार सोहळा 7 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5.30 वाजता तुळजापूर येथील भवानी कुंड, घाटशीळ रोड येथे होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणुन महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, महंत इच्छागिरी महाराज, महंत चिलोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, महंत योगी मावजीनाथ बाबा, महंत व्यंकट अरण्य महाराज, पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन साळुंके, भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे परमेश्वर कदम, उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो उपस्थितीत राहणार आहेत.
माजी आमदार मधुकरराव चव्हाण, सुजितसिंह ठाकुर,आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत, अभिमन्यू पवार, सुरेश धस, विक्रम काळे, सतीश चव्हाण, लातुर जिल्हाध्यक्ष माजी आमदार बसवराज पाटील, जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, माजी आमदार ज्ञानराज चौगुले, राजेंद्र राऊत,माजी खासदार रवींद्र गायकवाड, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष नेताजी पाटील, नितीन काळे, अनिल काळे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष महेंद्र धुरगुडे, शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, चेअरमन सुनील चव्हाण, मजुर फेडरेशन चेअरमन सतीश दंडनाईक, विक्रमसिंह देशमुख, संतोष बोबडे, दीपक आलुरे, नारायण नन्नवरे, सभापती आशिष सोनटक्के, आनंद पंडागळे, गुलचंद व्यवहारे, तानाजी कदम, श्रीकृष्ण सुर्यवंशी, शिवसेना तालुका प्रमुख अमोल जाधव यांची प्रमुख उपस्तीती असणार आहे.
स्वागताध्यक्ष माजी नगराध्यक्ष बाळासाहेब शिंदे व बाळासाहेब शामराज असणार आहेत. माजी नगराध्यक्ष सचिन रोचकरी, माजी नगरसेवक विनोद पिटू गंगणे, तालुकाध्यक्ष आनंद कंदले, शहराध्यक्ष शांताराम पेंदे हे निमंत्रक आहेत. शहर वासीय व विविध सामाजिक संघटनाचा यात सहभाग असणार आहे.
या सोहळ्यास उपस्थितीत राहावे असे आवाहन पंडितराव जगदाळे, सुहास साळुंके, राजेश शिंदे, चंद्रशेखर भोसले, विशाल छत्रे, प्रतिक रोचकरी, आण्णाप्पा पवार, धैर्यशिल दरेकर, शहाजी भांजी, नानासाहेब डोंगरे, निलेश आबा रोचकरी,विठ्ठल सोनवणे,पाराजी देवकर, राजेश्वर कदम, दिनेश क्षिरसागर,गोपाळ पवार, श्री गवळी, समर्थ पैलवान, रोहित चव्हाण, अजित अमृतराव, संतोष पवार, सचिन रसाळ, नागेश नाईक, सुहास गायकवाड, शिवाजीराव बोधले, नरेश अमृतराव, राजाभाऊ देशमाने, किशोर साठे, प्रकाश मगर, रत्नदिप भोसले, आप्पासाहेब पवार, राम चोपदार,सचिन घोडके, राजाभाऊ मलबा कदम, लखन पेंदे, चेतन शिंदे,नानासाहेब लोंढे, अंबरिष जाधव, सुरज साठे, प्रमोद दाणे, विनित रोचकरी, करण साळुंके, दिनेश बागल, नितीन पवार, अमर हंगरगेकर, विजय कंदले,औदुंबर कदम, विशाल रोचकरी, रामचंद्र रोचकरी, गिरीश देवळालकर, अविनाश गंगणे, सुनिल रोचकरी, अभिजीत कदम (चिवचिवे) संदिप गंगणे,अभिजीत कदम, मनोज गवळी, सागर कदम, सचिन साळुंके, इंद्रजित साळुंके, बाळासाहेब भोसले, विनोद पलंगे, दिग्वीजय सुर्यवंशी,शुभम क्षिरसागर, राहूल भालेकर, उमेश गवते, राजरत्न कदम यांनी केले आहे.