धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या मंदिरात दर्शनासाठी आलेल्या संस्कृतीक कार्य मंत्री आशिष शेलार यांना भविकांच्या रोशचा सामना करावा लागला. आम्ही 4-4 तास रांगेत तुळजाभवानी दर्शनासाठी उभे आहोत अनं तुम्ही थेट आत मध्ये घुसु नका असा संतप्त सवाल विचारला, त्यावर नाराज झालेल्या शेलार यांनी मंदिर संस्थानचा सत्कार न स्वीकारताच मंदिरातून काढता पाय घेतला. मंत्री शेलार यांनी नारळ प्रसाद स्विकारला नाही तसेच तुळजाभवानी मातेची आरती करणेही टाळले.
राज्याचे सांस्कृतिक मंत्री शेलार हे 4 नोव्हेंबर रोजी तुळजाभवानी मातेचे दर्शन करण्यासाठी आले होते. तुळजाभवानी मंदिरात त्यांचे दुपारी आगमन झाले, त्यावेळी ते व्हीआयपी प्रोटोकॉलसह थेट मंदिरात दाखल झाले मात्र अनपेक्षितरित्या दर्शन रांगेतील काही भाविकांनी शेलार यांना थेट सुनावल्याने खळबळ माजली. दर्शन रांगेतील भाविकाने जाब विचारल्याने नाराज झालेल्या मंत्री शेलार याने मंदिरातुन काढता पाय घेतला.
तुळजापूरच्या भवानी मातेच्या मंदिराच्या गाभाऱ्याच्या मजबुतीकरणासोबतच मंदिर परिसराचे जतन संवर्धनाचे काम सुरु असून शेलार यांनी कामांची पाहनी केली. तुळजाभवानी मंदिराच्या जीर्णोद्धारासंबंधित कामाची पाहणी करीत माहिती घेतली. यावेळी राज्य पुरातत्त्व विभागाचे संचालक डॉ. तेजस गर्गे, अन्य शासकीय अधिकारी आणि माजी जिल्हा परिषद उपाध्यक्षा अर्चना पाटील उपस्थित होत्या.
#Dharashiv #Maharashtra #AshishShelar












