धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या शाकंभरी नवरात्र उत्सवातील मुख्य आकर्षण असलेला जलयात्रा हा धार्मिक कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. शाकंभरी देवीची मूर्ती फळ भाज्या व फुलांचा वापर करून बनवण्यात आली, जलयात्रेत पारंपरिक वाद्य वाजवत महिला,भाविक सहभागी झाले आहेत.
पावसाळ्यानंतर पिकणारी सर्व फळे व भाज्या वापरून शाकंभरी देवीची हि आकर्षक मूर्ती तयार करण्यात आली आहे. तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाच्या वतीने हा कार्यक्रम गेली अनेक वर्षांपासून राबविला जात आहे.तुळजाभवानी देवीचे महंत तुकोजी बुवा, महंत वाकोजी बुवा, तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, शाकंभरी उत्सावाचे मानकरी यासह पुजारी, महिला, भाविक सहभागी झाले होते.
तुळजापूर शहरातील हजारो महिलांनी पापनाश तीर्थातील जल घागरीत भरून ती घागर डोक्यावर घेऊन सहभागी झाल्या. शाकंभरी देवीची मूर्ती बनवताना कांदा,कोबी, टरबूज,पालक,मेथी, कारले,संत्री,डाळिंब,लिंबू , बटाटे, पापड, अद्रक, काकडी, गाजर,मिरची,लसूण आदींसह अननस, खरबूज, केळी आदीचा वापर करण्यात आला. डोळ्याचे पारणे फेडणारया जलदिंडी उत्सवात राज्यभरातून नागरिकांनी सहभाग घेतला आहे.
तुळजापुर शहर व पंचक्रोशीतील सुवासिनी पापनास तिर्थ येथील जल हे डोक्यावरील कलशात जल भरतात व त्यावर नारळ ठेवुन वाजत गाजत त्यांची मिरवणूक काढली जाते सोबतीला पुरुष ही असतात सगळ्या पुढे ढोलीबाजा आराधी ,वाघ्या मुरळी हे सगळे जण या उत्सवात अगदी हिरिरीने सहभागी झाले.
जल यात्रेतील रथामध्ये वेगवेगळ्या भाज्या फळे ठेवुन देवीची मुर्ती उभारण्यात आली. चांदीच्या कलशात पापनास तिर्थाचे जल भरुन शिवाजी चौक ते तुळजाभवानी मंदिरपर्यंत ही यात्रा पायी संपन्न झाली. महिलांनी आणलेल्या तीर्थतील पाण्याने देवीचा मंदिर परिसर स्वच्छ करण्यात आला. मंदिर स्वच्छ झाल्यानंतर या महिलांचा साडी चोळी देऊन मंदिर समितीकडून सत्कार ही करण्यात आला. तुळजाभवानी मंदिरात दोन नवरात्र उत्सव साजरे केले जातात शाकंभरी हा धाकटा नवरात्र उत्सव म्हणून ओळखला जातो.
जलयात्रेत सहभागी सुवासिनी, कुमारीका, आराधनी यांना 5001 कलश (जलकुंभाचे) वाटप करण्यात आले तर कुमारिका व महिलांना 2100 साड्यांचे वाटप करण्यात आले. जलयात्रेत दिंड्या, पताका, गोंधळी, आराधी, वारूवाले, धनगरी ढोल यांना निमंत्रित करण्यात आले होते. जलयात्रेमध्ये येणाऱ्या प्रत्येक भक्तांना मिष्टान्न भोजनाची व्यवस्था दरवर्षी प्रमाणे करण्यात आली होती. यासाठी 1100 किलो तांदूळ वापरून व्हेज पुलाव, 800 किलोच्या गव्हाच्या पिठाच्या चपाती, 21 हजार बालुशाही तसेच खारीबुंदी, शेवग्याचे वरण, पालक भाजी हे सर्व वापरून 21 हजार पिण्याच्या पाण्याची बॉटलची व्यवस्था तुळजाभवानी प्रक्षाळ मंडळाने स्वखर्चाने केली.












