धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या तुळजाभवानी मंदीर संस्थानचा लोगो अंतीम करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबविली जाणार असुन भाविक व नागरिकांना 20 ऑक्टोबर ते 3 नोव्हेंबर या काळात मंदीर संस्थानच्या वेबसाईट जाऊन 5 पैकी एका लोगोला मतदान करता येणार आहे. मतदान करावे असे आवाहन जिल्हाधिकारी तथा मंदीर संस्थानचे अध्यक्ष डॉ सचिन ओम्बासे यांनी केले आहे.
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तुळजापूर लोगो तयार करण्यासाठी आयडिया कंपेटिशन घेण्यात आले होते. त्याद्वारे प्राप्त होणाऱ्या डिझाईनमधून आकर्षक असणारे डिझाईन निश्चीत करून त्याप्रमाणे लोगो तयार करण्याबाबत मंजूरी देण्यात आली होती.त्याप्रमाणे
सर्व लोगोंची तपासणी पाळीकर पुजारी मंडळ, भोपे पुजारी मंडळ, उपाध्ये पुजारी मंडळ यांच्या प्रतिनिधीकडून तसेच चित्रकला क्षेत्रातील तज्ञ व मंदिराचे विश्वस्त आणि अधिकारी यांनीही सर्व लोगोंची पाहणी करून एकूण पाच लोगोची मतदान प्रक्रिया राबवून लोगो निश्चिती करण्यासाठी निवड केली आहे.
लोगोंना सर्व जनतेने मतदान करावे यासाठी पाच लोगो मंदिराच्या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. भाविकांनी मतदान करण्यासाठी मंदिर संस्थान च्या अधीकृत https://voting.shrituljabhavanimataseva.org/Login.php लिंकवर जाऊन लोगोची पाहणी करून मतदान करावे. निवडलेल्या 5 लोगोंमधून सर्वाधिक पसंती मिळालेल्या लोगोस मंदिर संस्थानचा लोगो म्हणून मान्यता देण्यात येईलतरी सर्व जनतेस असे आवाहन करण्यात येते की सर्वांनी लोगोची पाहणी करून मतदान करावे.