पालकमंत्री, महायुती व महाविकास आघाडीला निमंत्रणच नाही, चाललंय तरी काय ?
धाराशिव – समय सारथी
तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या मागणी प्रमाणे राज्याचे संस्कृतीक मंत्री आशिष शेलार हे 18 ऑगस्ट रोजी मुंबईत तुळजाभवानी मंदिर जीर्णोद्धार बाबत बैठक घेणार आहेत. या बैठकीला पालकमंत्री यांच्यासह महायुती व महाविकास आघाडीच्या नेत्यांना निमंत्रणच देण्यात आले नाही, त्यामुळे चाललंय तरी काय? हा प्रश्न उपस्थितीत झाला आहे. आमदार यांना कोणाला बोलवायचे होते, कोणावर तक्रारीत रोष होता याची ‘यादी’ या. निमित्ताने जाहीर करावी. या बैठकीबाबत कल्पना नसल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले.
पालकमंत्री प्रतापराव सरनाईक तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचे अध्यक्ष आहेत, त्यांचा मंदीर व जीर्णोद्धार कामाशी काय संबंध ? आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत हे भुम परंडयाचे आमदार त्यांचा तुळजापूरचा काय संबंध ? महायुती घटक पक्षाचे जिल्हाध्यक्ष यांना कुठे मुंबईला मंत्र्यांच्या उच्चस्तरीय बैठकीला बोलवत असतात का ? जणू अशीच भुमिका आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी घेतलेली दिसतेय. तक्रार माझी, सांगणारा व सोडवणारा मीच अश्या सगळ्या भुमिका ते एकाच वेळी बजावत असल्याने ‘ऑस्कर’ साठी पात्र ठरतात.
तुळजापूरच्या बदनामीचे षडयंत्र करणारा सूत्रधार शोधा, अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक घ्या अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी संस्कृती मंत्री आशिष शेलाराकडे केली होती. कहना क्या चाहते हो भाई.. असे म्हणण्याची वेळ आली आहे. या बैठकीला जिल्हाधिकारी व शासकीय अधिकारी यांच्यासह तिन्ही पुजारी मंडळाचे अध्यक्ष यांना बोलावले आहे.
तुळजाभवानीच्या ऐतिहासिक कार्यासाठी शून्य योगदान असणारे महाविकास (आधीच्या प्रेस नोटमध्ये महायुती) आघाडीतील काही विरोधक जाणीवपूर्वक खोटी माहिती पसरवत आहेत त्यामुळे तुळजाभवानी मंदिरात सुरू असलेल्या जिर्णोद्धार कामाबाबत भाविकांच्या मनात नाहक संभ्रम निर्माण होत आहे. तुळजाभवानी देवीच्या भक्तांमध्ये अस्वस्थता निर्माण करणारे हे षडयंत्र तातडीने उघड होणे गरजेचे आहे.
तुळजाभवानी मातेच्या भाविकांना संभ्रमित करणारा आणि जाणीवपूर्वक सुरू असलेला अपप्रचार थांबवण्यासाठी हे षडयंत्र तातडीने उघड करणे आवश्यक आहे. त्यासाठी सर्व संबंधितांची लवकरात लवकर बैठक आयोजित करण्यात यावी आणि यामागील सूत्रधार शोधून काढावेत अशी मागणी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांच्याकडे केली होती मात्र सत्ताधारी व विरोधी असे कोणालाच बोलावले नाही.