धाराशिव – समय सारथी
मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी रोजी मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वात मुंबई येथे होणाऱ्या उपोषण आंदोलनात सहभागी होण्यासाठी ट्रॅकटर रॅली व ट्रॅक्टरला परवानगी द्यावी या मागणीसाठी सांजा गावातील नागरिकांनी शेकडो ट्रॅकटर रिक्षा घेऊन थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ट्रॅकटरला परवानगी द्यावी यासाठी थेट ट्रॅक्टर घेऊन समाज बांधव जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले वा त्यांनी मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी यांना दिले.
20 जानेवारीच्या मुंबई येथील आंदोलनाची ही पुर्व तयारी असुन ट्रकटरला बंदी घातल्याचा निषेध तरुणानी केला आहे. एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी देत आंदोलक यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले व सरकारने ट्रॅक्टर घातलेल्या बंदीचा निषेध केला. ट्रॅकटरला परवानगी द्यावी अशी मागणी आहे. मुंबई येथील आंदोलनात सांजा गावातील किमान 1 हजार मराठा बांधव सहभागी होणार आहेत असा संकल्प केला.
सदानंद सूर्यवंशी, अभय नायकल, संजय सूर्यवंशी, विशाल सूर्यवंशी, गफूर शेख, वैभव सूर्यवंशी, गणेश सूर्यवंशी, अक्षय शेळके, समाधान शिंदे, अक्षय सूर्यवंशी,प्रतीक कदम, विजय सूर्यवंशी व अमोल जाधव, सताजी सुर्यवंशी,बप्पा सुर्यवंशी,सतीश सुर्यवंशी,बालाजी शिदे,प्रशांत सुर्यवंशी,बाळासाहेब सावंत,सुनिल सुर्यवंशी, तुषार सुर्यवंशी यांच्या पुढाकारात ग्रामस्थ यांनी रॅलीत सहभागी नोंदवीला.