धाराशिव – समय सारथी
एप्रिल महिन्याच्या पहिल्या तारखेपासून टोलमध्ये वाढ करण्यात आली आहे. राज्यातील या वाढलेल्या टोलधाडीमुळे सर्वच वाहन चालकांना आर्थिक फटका बसणार आहे, सर्व प्रकारच्या वाहनांचा टोल वाढला असुन सुधारित शुल्कच्या नावाने वाढ करण्यात आली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील येडशी तसेच तामलवाडी येथील टोल नाक्यावर हलक्या वाहनांना एकेरी फेरीसाठी 75 रुपये आहे. 24 तासाच्या आत परतीचा प्रवास केल्यास दोन्ही मिळून 110 रुपये टोल होता, त्यामध्ये 3 टक्क्यांची वाढ होऊन आता 115 रुपये करण्यात आला आहे. 24 तासाच्या आत 25 टक्के सवलत देण्यात आली आहे.
याशिवाय फास्टटॅग नसलेल्या किंवा फास्टटॅगची वैधता संपलेल्या वाहनांना दंडाचे दुप्पट शुल्कही आकारले जाणार आहे. या मार्गावर 2044 पर्यंत म्हणजेच आणखी 19 वर्षे टोल द्यावा लागणार आहे. वेळेच्या टोल दरानूसार 40% सवलत राहील म्हणजेच टोलचा भुर्दंड हा कायमचा भार असणार आहे.