उद्योगमंत्री असताना काय केले ? तेरणा बंद पाडला, बेरोजगार केले आणि आता स्वप्न.. प्रवृत्तीला विरोध
धाराशिव – समय सारथी
तेरणा साखर कारखान्याच्या शिल्लक जागेत एमआयडीसी सुरु करावी अशी मागणी भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे करुन शेतकरी व बेरोजगार तरुणांना सोबत घेऊन तेरणा परिसराची पाहणी केली होती त्यानंतर त्यांच्यावर टिकेची झोड उठत आहे. तेरणा कारखाना तुम्हीच बंद पाडून लोकांना बेरोजगार केले, तेरणा 12 वर्ष बंद असताना काही केले नाही, आता सगळं सुरळीत सुरु असताना खोडा घालण्यासाठी लोकांना स्वप्न दाखवीत आहेत.
उद्योग राज्यमंत्री असताना राणाजगजीतसिंह पाटील यांनी एकही उद्योग सुरु केला नाही, आमचा व्यक्ती व उद्योग याला विरोध नसुन आमदार राणा यांच्या प्रवृत्तीला विरोध आहे असे ऍड अजित खोत यांनी म्हणत हल्लाबोल केला. खुपच पुळका असेल तर आमदार पाटील यांनी स्वतःची तेरणा काठची 100 एकर जमीन एमआयडीसीला दान द्यावी असे खोत म्हणाले.
तेरणा कारखाना सुरु करण्यासाठी लढा सुरु केला होता त्यामुळे एक शेतकरी पुत्र या नात्याने मी पत्रकार परिषद घेत असल्याचे ऍड अजित खोत यांनी सांगितले. या विषयात कोणतेही राजकारण करायचे नसुन खासदार ओमराजे व आमदार राणा पाटील यांनी तेरणा व शेतकरी यांच्यासाठी काही केले नाही असा आरोप केला.
गेल्या 40 वर्षांपासुन डॉ पाटील परिवार यांची सत्ता असताना व गेली 12 वर्ष तेरणा बंद असताना काहीही केले नाही मग आताच तेरणा सुरळीत सुरु झाल्यावर का सुचले. खासदार आमदार या दोघांनी प्रयत्न केले नाही, यां दोन्ही भावांनी तेरणेकडे त्या काळात बघितले नाही.आजच आमदार राणा यांना एमआयडीसी का आठवली व उद्योगाचे सुचले. आजवर तुम्ही एक निर्माण केलेली संस्था दाखवा असे आव्हान आमदार राणा यांना केले.
आमदार राणा यांची एखाद्या उद्योगाकडे वक्रदृष्टी पाडली की ते उद्योग बंद पाडतात, समस्या अडचणी, अडथळे आणतात. त्यांनी काम ण केल्याने हजारो युवक बेरोजगार झाले व इतर ठिकाणी गेले त्यामुळे एक मतदार संघ कमी झाला, इतकी लोक बेरोजगारीमूळे स्थलांतरीत झाली.
तुळजाई साखर कारखान्यासाठी लोकांचे शेअर, पैसे गोळा केले आणि एक वीट सुद्धा उभारली नाही, कारखाना सुरु करुन दाखवा असे खोत म्हणाले. तेरणा सुरु होण्यासाठी तेरणा संघर्ष समितीच्या माध्यमातून डॉ तानाजीराव सावंत, अमित देशमुख यांच्या घरी आंदोलन केले त्यावेळी आम्हाला शेतकऱ्यांना अटक झाली तेव्हा कुठे होता असा सवाल खोत यांनी केला.
तेरणा कारखान्याला यां भागातील शेतकऱ्यांनी मोफत जमिनी दिली आहे तेव्हा तेरणा सुरु झाला. आमदार राणा यांची स्वतःच्या मालकीची 100 एकर जमीन आहे, त्या ठिकाणी पाणी सगळ्या सुविधा आहेत ती जमीन राणा यांनी पुळका असेल तर एमआयडीसीसाठी दान द्यावी मात्र तेरणाकडे वक्रदुष्टी टाकू नये, शरद पवार तुळजापूर येथील पत्रकार परिषदेत म्हणाले होते की कोणत्याही स्तिथीत तेरणा सुरु होत नाही मात्र शेतकरी यांनी आंदोलन करुन तो सुरु केला.
मेडिकल कॉलेज धाराशिव येथे मंजुर असताना मुंबई येथे घेऊन गेले. आमदार राणा यांनी लोकांना भुलथापा मारू नये ही विनंती असुन त्यांनी यात राजकारण करू नये, गेली 12 वर्ष तेरणा बंद असताना इतके दिवस झोपले होते का ? अगोदर कौडगाव येथील एमआयडीसी सुरु करा मात्र तेरणा कारखाना जमिनीवर वक्रदृष्टी टाकू नका अशी विनंती खोत यांनी केली.
40 वर्ष काय केले याचा हिशोब लोकांना द्या, कोणताही उद्योग सुरु झाला की बंद पाडायचा, जिल्हा बँक, सुत गिरणी काय झाले. एमआयडीसी उभारा किंवा अन्य काही करा याचा मोफत सल्ला त्यांनी देऊ नये. माझा विरोध व्यक्तीच्या प्रवृत्तीला आहे. करायचं काही नाही मात्र लोकांना दाखवायचे की मी काही तरी करतोय,नाकर्तेपणा आहे तो ते झाकून ठेवण्यासाठी ते हे करीत आहेत.