धाराशिव – समय सारथी
तहसीलदार यांच्या विरोधात पोलिसात दाखल केलेली तक्रार मागे घेण्यासाठी 15 लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी एका मंडळ अधिकाऱ्यासह एक जणांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. तुळजापूरचे तहसीलदार अरविंद बोळंगे यांच्या विरोधात मंडळ अधिकारी दिनेश बहिरमल यांनी पोलिसात तक्रार केली होती ती मागे घेण्यासाठी बहिरमल यांनी 15 लाख रुपये मागितले अशी फिर्यादी तहसीलदार बोळंगे यांनी दिल्याने तुळजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असुन तपास सुरु आहे.
दिनेश बहिरमल यांनी एसबीआय बँकेचे क्रेडीट कार्ड घेऊन त्याची रक्कम थकबाकी असल्यामुळे सदर बँकेस तहसीलदार यांचा नंबर दिला त्यामुळे बँकेने तहसीलदार यांच्या नंबरवर वारंवार फोन केले त्यामुळे तहसीलदार यांनी बहिरमल यांना रागावुन समज दिली त्यानंतर बहिरमल यांनी आनंद नगर पोलिस स्टेशन येथे तहसीलदार यांच्या विरोधात तक्रार दिली. सदरची तक्रार माघारी घेण्यासाठी बहिरमल व त्याचे वकील बालाजी बोडके यांनी तहसीलदार यांना सुरुवातीला 15 अलख नंतर 10 व नंतर 2 लाखाची मागणी केली.











