धाराशिव – समय सारथी
धाराशिव तालुक्यातील आळणी येथे एक धक्कादायक घटना घडली अडून पत्नीच्या अनैतिक संबंधांमुळे होणाऱ्या मानसिक त्रासाला कंटाळून पतीने व्हिडिओ रेकॉर्डिंग करीत आत्महत्या केली आहे. तानाजी नानासाहेब भराडे असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव असुन त्यांनी आत्महत्येपूर्वी एक व्हिडिओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर प्रसारित केला, ज्यात त्यांनी आपल्या आत्महत्येमागील कारण स्पष्ट केले आहे.
आळणी येथील रहिवासी असलेले तानाजी भराडे यांनी आपल्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी रेकॉर्ड केलेल्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपली पत्नी अनुराधा हिचे धाराशिव शहरातील दुकानदार बालाजी घाडगे याच्यासोबत अनैतिक संबंध असल्याचा आरोप केला आहे.
व्हिडिओमध्ये तानाजी भराडे यांनी म्हटले आहे की, “पत्नी अनुराधा आणि तिचा प्रियकर बालाजी घाडगे हे दोघे मिळून मला मानसिक त्रास देत होते. त्यांच्या या वागणुकीमुळे मी व्यथित झालो असून, याच कारणामुळे मी आत्महत्या करत आहे.