धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळेल का ? दिलेले आरक्षण टिकेल की नाही ? नाही टिकले तर मुलांना शिक्षण देऊ शकत नाही या निराशापोटी हतबल झालेल्या एका पित्याने गळफास घेऊन आत्महत्या करीत आरक्षणासाठी बलिदान दिले आहे. तुळजापूर शहरातील ही घटना असुन 55 वर्षीय दिगंबर वसंत काचोळे यांनी आत्महत्या केल्याने त्यांची 3 मुली 1 मुलगा असे 4 लेकरं पोरकी झाली आहेत.
मराठा समाजाला नुकतेच महाराष्ट्र शासनाने आरक्षण मंजुर केल्याने ते आनंदीत होते. त्यांनी संभाजी गणेश मडाळाने गणेश उत्सवामध्ये गणपती समोर मराठा आरक्षण देखाच्यासाठी बोर्ड तयार केले होते, त्यात त्यांनी सहभाग घेतला. मराठा बांधवासोबत मराठा समाजाला आरक्षण मिळाले बाबत आनंद उत्सवही साजरा केला होता. परंतु गेले दोन दिवसापासून मराठा आरक्षण सरसकट मिळत नसलेबाबत बातम्या येत असल्याने ते नेहमी आपल्या सामाजाचे आरक्षण टिकते का नाही असे मुलाजवळ नाराजीने बोलत होते.
मनोज दादा जरांगे यानी मराठा आरक्षणास शासनाने धोका दिल्यास आपण मुंबईचा भाजीपाला बंद करू असे म्हणाल्याने ते चिंतेत होते की आरक्षण मिळेल की नाही त्यामुळे ते नाराज होवुन घराबाहेर गेले, थोड्या वेळाने परत घरी आले व मुलांना जेवन केले का म्हणून विचारले नंतर त्यांनी मुलगा समर्थ, मुलगी नयन, एश्वर्या व काजल हिच्या डोक्यावरून हात फिरवुन ते घरातील खोलीमध्ये झोपन्यासाठी जावुन दरवाचा बंद केला व गळ्यातील पंच्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.