धाराशिव – समय सारथी
मराठा समाजाला आरक्षण नसल्याने उमरगा तालुक्यातीl दाबका येथील 42 वर्षीय पदवीधर तरुण प्रशांत गोविंदराव पवार यांनी चिट्ठी लिहीत गळफास घेऊन आत्महत्या केली. शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. मराठ्यांना आरक्षण मिळत नसल्यामुळे मला काम नव्हते म्हणून मी मरतो आहे, अशी वहीवर चिट्टी लिहून प्रशांत पवार यांनी आत्महत्या केली, त्यांच्या पँटच्या खिशातून पोलिसांनी जप्त केली आहे. आरक्षण, नौकरी मिळत नसल्याने काही तरुण नैराश्यातून थेट जीवन संपवण्यासारखे टोकाचे पाऊल उचलत आहेत