धाराशिव – समय सारथी
कलाकेंद्रावरील नर्तकीच्या प्रेमात सर्वस्व गमावलेल्या बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांच्या मृत्यू प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे. पुजा गायकवाड नावाची ही नर्तकी आरोपी बनली असुन तिला 3 दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
धाराशिव जिल्ह्यातील पारगाव येथील तुळजाई कला केंद्रावर पुजा नर्तकी होती. तुळजाई कला केंद्र यामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले असुन बर्गे हे आत्महत्यापुर्वी गेले होते, तिथे नेमके काय झाले हे गुलदस्त्यात आहे. गेली अनेक दिवस ते कला केंद्रावर येत असल्याने हे कला केंद्र व तिथले काही जन चौकशीच्या फेऱ्यात आले आहेत. या वादग्रस्त केंद्रावर अनेक गैरप्रकार सुरु असल्याने प्रशासनाने कारवाई झाली मात्र नंतर पुन्हा काही दिवसात राजकीय वरदहस्त व ‘वजन’ वापरून सुरु झाले.
धाराशिव जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्गावरील काही गावे व कला केंद्र अवैध धंद्याचे ‘अड्डे’ झाले आहेत. देवी देवतांची नावे वापरून कला केंद्र सुरु असुन यामुळे तरुण व्यसनाधीन झाले आहेत, अनेकांनी संपत्ती विकली आहे तर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.
गोविंद बर्गे यांच्या नातेवाईक आणि ग्रामस्थांनी ही आत्महत्या नसून घातपात असल्याचा दावा केला आहे. नर्तिकीने गोविंद यांच्या मृत्यूपूर्वी एका चित्रपटामधील गाण्यावर रील शेअर केली होती. कृष्णा चित्रपटातील झांझरिया या रिमिक्स गाण्यावरती तिने डान्स केला होता. एवढंच नाही तर घटनेच्या दिवशी पूजाने तीन रील सोशल मीडियावर शेअर केले होते.
पुजा गायकवाड ही 21 वर्षां असुन ती सोशल मीडियावर सक्रीय असते सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील सासुरे गावात राहत असुन बार्शी तालुक्यातील थापडीतांडा या गावातील कलाकेंद्रात दीड वर्षांपासून जात होती. तिथे तिची ओळख माजी उपसरपंच तथा ठेकेदार, व्यवसाईक असलेल्या गोविंद बर्गे यांच्याशी झाली. या ओळखीचे रुपांतर मैत्री आणि नंतर प्रेमात झाले. या प्रेमात गोविंद यांनी तिला दोन लाखांचा मोबाईलही गिफ्ट केला होता. महागड्या वस्तू आणि सोन्याचे दागिनी दिले होते. यानंतर पूजा पारगाव कला केंद्राकडे वळली तिथे दोघांचे प्रेम व वाद टोकाला गेला.
पुजाच्या प्रेमात बुडालेल्या गोविंद बर्गे यांनी तिला अनेक वस्तु, मॉलमध्ये शॉपिंग, जमीन, घर बांधून दिले मात्र तिची हाव संपली नाही, पुजाचा बर्गे यांच्या पेक्षा त्यांच्या संपत्तीवर जास्त जीव होता. बर्गे यांचा गेवराई येथील बंगला व भावाच्या नावाने 5 एकर जमीन 15 सप्टेंबर वाढदिवसापुर्वी करून दे अन्यथा बलात्काराचा गुन्हा नोंद करेल अशी धमकी दिल्याने ते तणावात होते. गेली 8 दिवसापासून पुजाने फोन घेणे बंद केले, 8 सप्टेंबर ते तुळजाई कला केंद्रावर गेले तिथे मॅनेजर व मैत्रिणीला तिला बोलवायला सांगितले मात्र तिने नकार दिला त्यानंतर ते थेट तिच्या गावी गेले व गाडीत डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली.