धाराशिव – समय सारथी
धाराशिव नगरपरिषदेच्या विद्यमान मुख्याधिकारी वसुधा फड यांच्या अडचणीत वाढ होणार असुन त्यांनी बोगस बिले काढल्याच्या तक्रार प्रकरणी वरिष्ठ अधिकारी चौकशी करणार आहेत. यलगट्टे यांनी घोटाळा, भ्रष्टाचार केला त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला व जेलवारी झाली त्याप्रमाणे फड यांनी काही केल्याचे समोर आल्यावर त्यांच्यावर गुन्हा नोंद करुन अद्दल घडवणार असे आमदार सुरेश धस म्हणाले. यलगट्टे बरे असे लोक म्हणत आहेत, फड यांच्या बाबतीत अनेक गंभीर तक्रारी असुन त्याचा आपण पाठपुरावा करीत आहेत, भ्रष्टाचार व भ्रष्टाचारी यांना आपण सोडणार नाही असेही ते धाराशिव येथे आल्यावर पत्रकार यांच्याशी संवाद साधताना बोलले.
धाराशिव नगरपरिषद अंतर्गत लेखासंहिता २०१३ प्रकरण कामे अंतर्गत नियम १३८ प्रमाणे कार्यवाही करीता कामांचा छाननी तक्ता तयार करून विविध विभागातील बोगस बिले काढले असल्याची तक्रार आमदार सुरेश धस यांनी केली होती शिवाय याबाबत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता. या तक्रारीची चौकशी करण्यासाठी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मैनाक घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करावी अशी मागणी धस यांनी जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांच्याकडे केली होती त्यावर ओम्बासे यांनी घोष यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करुन त्यांच्या स्तरावर सदस्यांची नेमणूक करावी व चौकशी करुन वस्तूस्तिथीदर्शक चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे.