परंडा केसची पुन्हा चौकशी करा, मुख्यमंत्री यांना वस्तुस्तिथी सांगितली, ड्रग्जमुळे पिढी बरबाद
धाराशिव – समय सारथी
ड्रग्ज तस्करांचा बिमोड केल्या शिवाय स्वस्थ बसनार नाही असा प्रण करीत तुळजापूर व परंडा येथील अटकेत व फरार आसलेल्या आरोपीचीं बॅक खाती गोटविण्यात व संपत्ती जप्त करण्याची कारवाई करण्यात यावी अशी मागणी भाजपचे नेते माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी केली. परंडा येथील ड्रग्ज प्रकरण तुळजापुर पेक्षा मोठे आहे, या प्रकरणाकडे परंडा पोलीसांचे दुर्लक्ष झाले आहे असा आरोप त्यांनी केला.परंडा येथील ड्रग्ज प्रकरण तूळजापुर येथील ड्रग्ज प्रकरणा पेक्षा मोठे असुन तरूण पिढी बरबाद करणाऱ्या ड्रग्ज तस्करीचा बिमोड केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे माजी आमदार सुजितसिंह ठाकुर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केला आहे.
परंडा येथील भाजपाच्या कार्यालयात पत्रकार परिषद घेण्यात आली त्यावेळी ते बोलत होते..या पत्रकार परिषदेस भाजपा किसान मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष ॲड संतोष सुर्यवंशी,अल्पसंख्यांक प्रदेश उपाध्यक्ष ॲड जहिर चौधरी,भाजपा तालूका अध्यक्ष अरविंद रगडे, युवा नेते समरजितसिंह ठाकूर हे उपस्थिती होते .
यावेळी ठाकुर म्हणाले की परंडा व तूळजापूर येथील ड्रग्ज प्रकरणा विषयी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर बोलणे झाले असून ड्रग्ज प्रकरणी कठोर कारवाई करावी अशी मागणी केली आहे त्या नुसार मुख्यमंत्र्यांनी कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी कोणीही असो कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्यांनी त्यांना सहकार्य करू नये. माझ्या घरचा,माझ्या जवळचा कार्यकर्ता जरी आरोपी निघाला तरी कठोरात कठोर कारवाई करावी असे त्यांनी सांगीतले.
मागील वर्षी ड्रग्ज प्रकरणी दोन आरोपीवर गुन्हा दाखल करून आरोपीकडून ड्रग्ज जप्त करण्यात आला होता व आरोपीनी ड्रग्ज विकत व घेत असल्याची कबुली दिली होती मात्र प्रयोग शाळेतून कॅल्शीयम क्लोराईड असल्याचा अहवाल आला, ड्रग्जचे सॅम्पल हे होमगार्ड मार्फत तपासणीला पाठवण्यात आले. आरोपीनी कॅल्शियम क्लोराईड सोबत बाळगण्याचे कारण काय होते. जप्त ड्रग्जचा नमुने बदलन्यात आला असल्याची शक्यता असुन या प्रकरणाची सखोल चौकशी करावी व ती केस मागे घेऊ नये तसेच परंडा शहरात मोठ्या प्रमाणात गावठी पिस्टल आल्या आहेत त्याचा पण शोध घेण्यात यावा आशी मागणी पोलिस अधिक्षक यांच्या कडे करण्यात आली असल्याचे ठाकुर यांनी सांगितले.
मी सोलापूर व धाराशिव पोलिस अधीक्षक यांच्याशी बोललो आहे,आरोपी व पोलिस यांचे सीडीआर तपासण्यात यावेत अशी मागणी त्यांनी यावेळी केली. आरोपीचे पोलिसांशी लागेबाधे आहेत त्यामुळे त्याची चौकशी होणे गरजेचे आहे. तुळजापूर पेक्षा परंड्यात भयानक स्तिथी आहे. सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येत आवाज उठवला पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. परंडा येथील प्रकरणात फिर्यादी शिंदे यांनी कोर्टात लिहून दिले आहे की, केस निकाली काढावी मात्र त्याची पुन्हा चौकशी व्हावी अशी मागणी ठाकुर यांनी केली. ड्रग्जचे प्रकरण गंभीर आहे, युवक व्यसनाधीन होऊन त्यांचे आयुष्य कुटुंब उध्वस्त होत आहे त्यामुळे याची सखोल चौकशी झाली पाहिजे अशी मागणी त्यांनी केली.