धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचे जेष्ठ बंधु सुभाष जयवंतराव सावंत यांचे शनिवार 27 जुलै रोजी अल्पशा आजाराने दुःखद निधन झाले. सुभाष सावंत हे माजी सरपंच होते, त्यांना अनिल, रवी व विजय अशी मुले आहेत.
लहानपणापासून आजपर्यंत प्रत्येक सुख दुःखात यश-अपयशात पाठीशी असलेल्या मोठ्या भावाचा आधार आज हरपला आहे अशी प्रतिक्रिया मंत्री सावंत यांनी दिली.
सुभाष सावंत यांच्यावर वाकाव, ता माढा जि.सोलापूर येथे रविवारी 28 जुलै रोजी सकाळी 8 वाजता अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.