धाराशिव – समय सारथी
धाराशिव येथील 140 कोटी रुपयांच्या कामाला देण्यात आलेले कार्यारंभ आदेशाला नगर विकास विभागाने स्थगिती दिली असुन तसे पत्र धाराशिव मुख्याधिकारी यांना काढले आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी याबाबत 2 वेळेस तक्रार केली होती अखेर त्याची दखल घेत कार्यादेश देण्याच्या शिफारशीस स्थगिती देण्यात आली आहे.
जीएसटी कपात व नवीन निविदा स्पर्धा झाल्यास काही कोटी वाचणार आहेत. पुन्हा निविदा काढल्यास सरकारचे काही कोटी वाचणार आहेत अशी ठाम भुमिका सरनाईक यांनी घेतली आहे. मर्जीतील अजमेरा या ठेकेदारास काम देण्याचा भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा मनसुबा पालकमंत्री सरनाईक यांनी उधळुन लावला आहे. जनतेचे हाल व सरकारचे नुकसान होऊ देणार नाही, पालकमंत्री म्हणुन त्यांनी ती जबाबदारी स्पष्ट केली आहे.

धाराशिव रस्ते विकास प्रकल्पाच्या अनुषंगाने नगरोत्थान महाभियानांतर्गत गठित राज्यस्तरीय प्रकल्य मान्यता समितीच्या 18 सप्टेंबर 25 रोजीच्या बैठकीमध्ये सदर प्रकल्पाच्या निविदेच्या अनुषंगाने कार्यादेश देण्याबाबतच्या शिफारशीस तूर्त स्थगिती ‘देण्यात येत आहे या संदर्भात प्राप्त तक्रार व निवेदनातील वस्तुस्थिती तपासून याबाबतचा स्वयंस्पष्ट अहवाल शासनास सादर करावा असे निर्देश











