धाराशिव – समय सारथी
स्टारलिंकची उपग्रह आधारित इंटरनेट सेवा धाराशिवला मिळणार असल्याची माहिती भाजप जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी दिली आहे. या सेवेमुळे इंटरनेट व इतर सुविधा ग्रामीण भागात मिळणार आहेत. यामुळे डिजिटल क्रांती होणार असुन या ऐतीहासिक निर्णयाबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जिल्हाध्यक्ष कुलकर्णी यांनी आभार मानले.
महाराष्ट्र सरकारने उद्योगपती एलन मस्क यांच्या स्टारलिंक सॅटेलाइट कम्युनिकेशन्स प्रायव्हेट लिमिटेड सोबत उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा स्थापन करण्यासाठी भागीदारीची घोषणा केली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की यामुळे धाराशिव, नंदुरबार, वाशिम आणि गडचिरोली सारख्या जिल्ह्यांमध्ये ग्रामीण समुदाय, सरकारी संस्था आणि महत्त्वाच्या सार्वजनिक पायाभूत सुविधांसाठी उपग्रह-आधारित इंटरनेट सेवा स्थापन करण्यासाठी स्टारलिंकसोबत करार करण्यात आला.












