धाराशिव – समय सारथी
धाराशिव पोलिस अधीक्षक पदी रितु खोकर यांची नियुक्ती करण्यात आली असुन पोलिस अधीक्षक संजय जाधव यांची बदली करण्यात आली आहे. खोकर ह्या सध्या सांगली येथे अपर पोलिस अधीक्षक असुन 2018 बॅचच्या त्या आयपीएस अधिकारी आहेत त्यांना 141 रँक मिळाली होती. त्यांचे वडील माजी सरपंच असुन मुळं गाव हे पानीपत येथे आहे. त्या कुरुक्षेत्र विद्यापीठाच्या एमएससी गोल्ड मेडलिस्ट आहेत. तुळजापूर येथील ड्रग्ज प्रकरण यासह अन्य बाबी त्यांच्या समोर आव्हान असणार आहे. संजय जाधव हे नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. राज्यातील 22 IPS अधिकारी यांच्या बदल्या झाल्या आहेत.
22 IPS अधिकारी बदली, नियुक्ती –
राकेश ओला, पोलीस अधीक्षक, अहमदनगर यांची बदली पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. सोमनाथ घार्गे, पोलीस अधीक्षक, रायगड यांची बदली पोलीस अधीक्षक, अहमदनगर (अहिल्यानगर) झाली आहे. आंचल दलाल, समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. १, पुण े यांची बदली पोलीस अधीक्षक, रायगड म्हणून करण्यात आली आहे.महेंद्र पंडित, पोलीस अधीक्षक, कोल्हापूर यांची बदली पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर येथे करण्यात आली आहे.योगेश कुमार गुप्ता, पोलीस अधीक्षक, नागरी हक्क संरक्षण, नांदेड यांची बदली पोलीस अधीक्षक, कोल्हापूर येथे झाली आहे. बच्चन सिंह, पोलीस अधीक्षक, अकोला यांची बदली समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ४, नागपूर येथे करण्यात आली आहे.अर्चित चांडक, पोलीस उप आयुक्त, नागपूर शहर यांची बदली पोलीस अधीक्षक, अकोला येथे झाली आहे. मंगेश शिंदे, पोलीस उप आयुक्त, विशेष कृती दल (आर्थिक गुन्हे), बृहन्मुंबई यांची बदली पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, नागपूर येथे करण्यात आली आहे.
राजतिलक रोशन, सहायक पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था), महाराष्ट्र राज्य, मुंबई यांची बदली पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई येथे झाली आहे. बाळासाहेब पाटील, पोलीस अधीक्षक, पालघर यांची बदली पोलीस अधीक्षक, नाशिक ग्रामीण येथे करण्यात आली आहे. यतिश देशमुख, अपर पोलीस अधीक्षक, अभियान, गडचिरोली यांची बदली पोलीस अधीक्षक, पालघर येथे झाली आहे.सौरभ अगरवाल, पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग यांची बदली पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, पुणे येथे करण्यात आली आहे. मोहन दहिकर, पोलीस उप आयुक्त, ठाणे शहर यांची बदली पोलीस अधीक्षक, सिंधुदुर्ग येथे झाली आहे. विश्व पानसरे, पोलीस अधीक्षक, बुलढाणा यांची बदली समादेशक, रा. रा. पोलीस बल गट क्र. ९, अमरावती येथे करण्यात आली आहे.निलेश तांबे, पोलीस अधीक्षक, गुन्हे अन्वेषण विभाग, नागपूर यांची बदली पोलीस अधीक्षक, बुलढाणा येथे झाली आहे.
समीर अस्लम शेख, पोलीस अधीक्षक, सातारा यांची बदली पोलीस उप आयुक्त, बृहन्मुंबई येथे करण्यात आली आहे. तुषार दोषी, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग, पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक, सातारा येथे झाली आहे. सोमय विनायक मुंडे, पोलीस अधीक्षक, लातूर यांची बदली पोलीस उप आयुक्त, परिमंडळ १, छत्रपती संभाजीनगर येथे करण्यात आली आहे.जयंत मीना, पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक, पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक, लातूर येथे झाली आहे. नितिन बगाटे, पोलीस उप आयुक्त, छत्रपती संभाजीनगर शहर यांची बदली पोलीस अधीक्षक, रत्नागिरी येथे करण्यात आली आहे. रितु खोकर, अपर पोलीस अधीक्षक, सांगली यांची बदली पोलीस अधीक्षक, धाराशिव येथे झाली आहे.