धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्याचे राजकारण हे वेगळ्या पद्धतीने सुरु आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या बाबतीत ‘ढोलकीला बांधून तुला बदाबदा बडवीन’ अश्या स्वरूपाच्या रिल्स, व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या जोरदार व्हायरल होत आहेत. धाराशिव जिल्ह्यात पूर्वीच रक्तरंजित राजकारणाचा इतिहास आहे, तो सर्वाना माहिती आहे त्यामुळे हा प्रकार पाहून कुठे नेऊन ठेवला माझा धाराशिव जिल्हा असे म्हण्याची वेळ आली आहे अशी सर्व पक्षाच्या नेत्यांना आत्मचिंतन करायला भाग पाडणारी पोस्ट शिवसेना शिंदे गटाचे नेते ऍड अजित अण्णा खोत यांनी सोशल मीडियावर पोस्ट करीत आवाहन केले आहे.
राजकारणात वैचारिक मतभेद असतात, वैयक्तिक घ्यायचे नसते. भाई उद्धवराव पाटील यांच्या या धाराशिव जिल्ह्यामध्ये विचाराचे राजकारण असायचे पण सध्याचे राजकारण हे रक्तरंजित आणि वैचारिक पातळी सोडल्याने निर्लज्जपणाचा कळस झालेला आहे. एकमेकांना ‘तुला मारीन, बडवीन’ असे जर जाहीर रिल्स टाकून कोणी म्हणत असेल आणि त्याचे समर्थन तर त्यांचे नेते करत असतील तर अशा राजकारण्यांना जनता निश्चितच धडा शिकवेल असे ते म्हणाले.
खासदार, आमदार मग ते कोणत्याही पक्षाचे असो ते संविधानिक पदावर असतात, निवडणुका संपल्या ते निवडून आले की ते जनतेचे प्रतिनिधी असतात. ओमराजे यांना वारंवार उघड उघड व्हिडिओ, रिल्स, कार्टूनच्या माध्यमातून धमकी देण्याचे सत्र सुरु आहे. हे चुकीचे असुन त्याच्या जीवाला धोका निर्माण झाला किंवा काय झाले तर त्याला जबाबदार कोण ? पोलीस प्रशासनाने या बाबीची व्हिडिओ यांची दखल घेऊन राजकारणात चालू असलेली धमकीगिरी तात्काळ रोखावी हीच एक सर्वसामान्य नागरिकाचे अपेक्षा व्यक्त केली आहे.
राहिला प्रश्न कोणी विकास केला कोणी कीव कोणी नाही, त्यावरती चर्चासत्र घडू शकते. ज्या पद्धतीने वैचारिक राजकारणाची पातळी सोडून एखाद्याला बडवण्याची भाषा ज्या वेळेस होते, त्यावेळेस आपण राजकारणाची पातळी किती खालावली याकडेही लक्ष देणे व आत्मचिंतन करणे गरजेचे आहे.
एवढा सुचक पोस्टरुपी मेसेजवर असे सगळे प्रकार थांबले तर ठीक.. नाही तर परत मात्र पक्षही बघणार नाही, नेता बघणार नाही, प्रत्येकाचाच इतिहास काढून जनतेसमोर उघडे करायला आम्हाला वेळ लागणार नाही असा गर्भित इशारा ऍड अजित खोत यांनी पोस्टच्या माध्यमातून दिला आहे.











