धाराशिव नगर परिषदेतील विविध कामात झालेल्या करोडो रुपयांच्या घोटाळा प्रकरणी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी स्थापन करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. अवर सचिव रवींद्र औटे यांनी राज्याच्या पोलीस महासंचालक यांना एसआयटी स्थापन करण्याचे लेखी आदेश दिले असून समिती स्थापन करुन तपास करण्याची कारवाई सुरु करावी असे नमूद केले आहे.
विधान परिषदेचे आमदार सुरेश धस यांनी धाराशिव नगर परिषदेत अपहार व अनेक कामात घोटाळे झाल्याची तक्रार केली होती तसेच विधान परिषदेत तारांकित प्रश्न उपस्थितीत केला होता त्यावर चर्चेदरम्यान उपमुख्यमंत्री यांनी समिती गठीत करण्याचे आश्वासन दिले होते त्यानुसार समिती गठीत करण्यात आली आहे. समिती गठीत करण्यात आल्याने भ्रष्ट अधिकारी व संबंधित लोकप्रतिनिधी यांचे धाबे दणाणले आहे.
धाराशिव नगर परिषदेत विविध घोटाळ्याचे 7-8 गुन्हे नोंद असून बायोमायनिंग प्रकरण, गुंठेवारी यासह अन्य अंतीम टप्प्यात आहेत त्यामुळे ही एसआयटी सर्व मुद्याचा तपास करणार आहे.