तुळजापूर – समय सारथी
तुळजापूर ड्रग्ज तस्करी व रॅकेट अतिशय गंभीर असून त्यामुळे अनेक जण व्यसनाच्या आहरी गेले आहेत, ड्रग्जमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत आहेत त्यामुळे याप्रकरणी आरोपीवर मकोका लावावा व एसआयटी पथक नेमून चौकशी करावी अशी मागणी़ महाविकास आघाडीच्यावतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देऊन करण्यात आली.
तुळजापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आई तुळजाभवानीचे दर्शन घेण्यासाठी आले असता महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या शिष्टमंडळाने त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना ड्रग्स प्रकरणाचे जाळे उद्ध्वस्त करण्याचे साकडे घातले. यावेळी त्यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणाची पाळेमुळे शहर आणि ग्रामिण भागापर्यंत गेली आहेत. ती सर्व पाळेमुळे उखडून काढायची असतील तर मुख्य आरोपीवर कडक कायदाचा अवलंब करावा लागणार आहे. त्यामुळे भविष्यात ड्रग्ज व्यवसाय किंवा ड्रग्जचे सेवन करणार नाहीत. या प्रकरणात राजकीय पक्षांशी संबंधित असणाऱ्या पदाधिकाऱ्यांचा सहभाग असून यांचे धागेदोरे मुंबई, पुणे पर्यंत गेले असून या प्रकरणाची सखोल चौकशी करुन एसआयटी नेमावी. मुख्य आरोपी व दोषींवर मकोका लावण्यात यावा, आदी मागण्या केल्या आहेत. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष धीरज पाटील, माजी नगरसेवक राहुल खपले, शिवसेना उपजिल्हाप्रमुख श्याम पवार, राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमर चोपदार, भाई उत्तम अमृतराव, अनमोल साळुंके, अमोल कुतवळ नवनाथ जगताप श्रीकांत धुमाळ सुदर्शन वाघमारे दत्ता हंगरगेकर तोफिक शेख शरद जगदाळे विकास भोसले, माजी नगरसेवक नागनाथ भांजी, बाळासाहेब कदम, अमोल कुतवळ आदी उपस्थित होते.