गुडी पाडव्यापर्यंत उजनीचे पाणी सिना कोळेगाव धरणात आणणार : मंत्री डॉ तानाजीराव सावंत
परंडा – समय सारथी
राज्याचे आरोग्यमंत्री तथा पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांनी मोठी घोषणा केली असुन यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. उजनीचे पाणी सीना कोळेगाव या भागात आल्यावर शेतकऱ्यांसाठी उपसा सिंचन समिती स्थापन करुन शेतकऱ्यांना पाणी आल्यापासुन 5 वर्ष काळात येणारे वीज भैरवनाथ साखर कारखाना भरणार असल्याचे मंत्री सावंत यांनी जाहीर केले. गणेशउत्सवात गौरी आगमन दिवशी ही घोषणा केल्याने शेतकऱ्यात आनंदाचे वातावरण आहे.
गुडी पाडव्याला उजणी धरणाचे पाणी सिनाकोळगाव धरणात आनणार असल्याचे प्रतिपादन आरोग्यमंत्री प्रा.डॉ. तानाजीराव सावंत यांनी परंडा तालूक्यातील चिंचपूर (बु) येथे गाव संवाद दौऱ्यात दरम्यान बोलताना केले. उजनीचे पाणी आल्यास या भागात सिंचनाचे क्षेत्र वाढणार असुन हरितक्रांतीच्या माध्यमातून शेतकरी समृद्ध होणार आहे. सिंचनासाठी लागणारी कामे 95 टक्के पुर्ण झाली असुन पाणी आल्यावर या भागातील दुष्काळ कायमचा हटणार असुन स्वप्नपुर्ती होणार आहे.
मंत्री प्रा डॉ तानाजीराव सावंत म्हणाले की, उजणीचे पाणी आल्यावर तलावापासुन 5 ते 10 किलोमीटर अतंरावर लांब शेती असलेल्या शेतकऱ्यासाठी उपसा सिंचन समित्या स्थापण करून पाणी शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचवणार व पाणी आल्यापासुन पाच वर्षापर्यंत वीजबिल भैरवनाथ साखर कारखाना भरेल अशी शेतकरी हिताची मोठी घोषणा यावेळी आरोग्य आरोग्य मंत्री तानाजीराव सावंत यांनी केली.
यावेळी जिल्हाप्रमुख दत्ता अण्णा साळुंखे, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष धनंजय दादा सावंत, जिल्हा शिवसेना जिल्हा समन्वयक गौतम लटके , जेष्ठ नेते अॅड. सुभाष मोरे, शिवसेना तालुका संघटक जयदेव गोफणे, चिंचपुर ग्रामपंचायतीचे सरंपच डॉ. महेश देवकर, पंचायत समीतीचे माजी देवकर, आनिल सरपंच महादेव देवकर, प्रदिप पाटील, दत्ता कुलकर्णी, गणेश सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्पाचा धाराशिव व बीड जिल्ह्यातील 9 तालुक्यातील 133 दुष्काळी गावांना योजनेचा फायदा होणार आहे. मंत्री सावंत यांनी प्राधान्यक्रम बदलल्या नंतर राज्य मंत्रीमंडळाने 11 हजार 700 कोटीच्या कामांना मंजुरी दिली. 1 लाख 14 हजार हेक्टर क्षेत्राला लाभ होणार असुन जमीन सिंचनाखाली येणार आहे. धाराशिव जिल्ह्यातील परांडा, भूम, वाशी, कळंब, तुळजापूर, लोहारा व उमरगा तसेच बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्याला लाभ होणार आहे.