खासदार ओमराजे व राणा पाटील यांच्या वाद पेटला, अधिकाऱ्यांचा बळी ? जनता दरबारच्या वादाची किनार
धाराशिव – समय सारथी
कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प अंतर्गत तुळजापूर तालुक्यातील सिंदफळ येथे झालेल्या कार्यक्रम प्रकरणी सिंचन विभागाचे अधिकारी कायदेशीर कचाट्यात सापडले असुन 4 अधिकाऱ्यांना नोटीस देण्यात आली आहे. पाटबंधारे विभागाचे अधीक्षक भारत शिंगाडे, उपसा सिंचन विभागाचे कार्यकारी अभियंता प्रवीण चावरे, कृष्णा मराठवाडा प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता अमोल नाईक व सहायक अभियंता रोहन पवार यांना नोटीस पाठविण्यात आली असुन 24 तासात खुलासा करण्याची डेडलाईन दिली आहे. समाधानकारक खुलासा न दिल्यास शिस्तभंग व प्रशासकीय कार्यवाहीचा इशारा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी नोटीसीत दिला आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी याबाबत जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती त्यानंतर आता कारवाईला सुरुवात झाली आहे.
काही दिवसापुर्वी भाजप आमदार राणाजगजीत पाटील यांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या जनता दरबार व त्याला शासकीय अधिकारी उपस्थितीत राहत असल्याबाबत खासगीत आक्षेप घेतला होता. अधिकारी यांना अश्या बैठकांना उपस्थितीत राहण्याचा अधिकार नसल्याचे सांगत 2020 चा एक शासन निर्णय त्यांनी पुढे सरकावला होता. आता त्याचं शासन निर्णयाचा दाखला सिंदफळ येथील कार्यक्रमाबाबत घेण्यात आला आहे. एकंदरीत आमदार राणा पाटील यांनी जो शासन आदेश पुढे सरकावला होता तोच आता त्यांच्या सिंदफळ कार्यक्रमात अधिकाऱ्यावर कारवाईसाठी वापरण्यात आला आहे. इकडे आड, तिकडे विहीर अशी अधिकाऱ्यांची स्तिथी झाली आहे. या राजकीय वादात अधिकाऱ्यांचा मात्र बळी जातोय की काय अशी स्तिथी निर्माण झाली आहे.
सिंदफळ येथील कार्यक्रम हा राजकीय होता, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यामार्फत सर्व पत्रकार यांना योजनेची पाहणी करण्याचे निरोप देण्यात आले होते. कार्यक्रमासाठी लागणारा मंडप, नाश्ता, हारे तुरे, पीपीटी व्यवस्था व इतर खर्च हा अधिकारी व ठेकेदार यांनी केल्याची माहिती आहे.
सिंदफळ येथे झालेल्या कार्यक्रमावरून राजकीय वाद आता चांगलाच रंगला आहे. आमदार राणाजगजीतसिंह पाटील व काँग्रेस जिल्हाध्यक्ष धीरज पाटील यांच्यात आमने सामने हमारीतुमरी झाली. सिंदफळ येथील कार्यक्रम हा प्रशासकीय असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी भाषणात सांगितले त्यानंतर धीरज पाटील यांनी आक्रमक होत यावर आक्षेप घेतला. कार्यक्रम जर प्रशासकीय असेल तर मग भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील वगळता खासदार व लोकप्रतिनिधी यांना आमंत्रित का केले नाही ? शिष्ठाचाराचे पालन का केले नाही असे प्रश्न उपस्थितीत केले. तत्कालीन मुख्यमंत्री स्व विलासराव देशमुख यांनी हा निर्णय घेतला त्यांचे नाव सुद्धा घेत नाही व श्रेय डॉ पद्मसिंह पाटील यांना एकट्याला का देता असा सवाल केला.
आमदार राणा यांनी धीरज पाटील यांना बाळा म्हणताच पुन्हा वाद पेटला, तु धाराशिवचा पाटील असशील पण मी पण तुळजापूरचा पाटील आहे असे म्हणत आव्हान दिल्यानंतर शाब्दिक वाद वाढला. अंगाला हात लावू नका इथं पर्यंत हमरीतुमरी गेली. शेतकऱ्यांना भुसंपादन मावेजा दिला नाही यासह अन्य मुद्दे वादात भर घालणारे ठरले. कार्यक्रम स्थळावरून जाताना राणा पाटील यांनी पत्रकारांना चावणाऱ्यांची प्रतिक्रिया घेताय का असे म्हणतात धीरज पाटील यांना डीवचले त्यानंतर धीरज पाटील यांनी प्रतिउत्तर देत राणा पाटील यांना डॉबरमॅनची उपमा देत भौ भौ असे हिणवले व त्यांच्या वागण्याचा व वक्तव्याचा निषेध व्यक्त केला.
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांना उदघाटन्या रोग झाला असुन विकासाच्या गप्पा मारणाऱ्या पिता पुत्रांनी आत्मचिंतन करावे असे म्हणत ओमराजे यांनी पत्रकार परिषदेत हल्लाबोल केला. वाद सुरु असताना तिथे शेपूट घालत पळ काढुन यायचे व रिल्सवर डॉनबाजी करायची ? याला जनता उत्तर देईल असे ओमराजे म्हणाले. तुळजापूरकरांना कुत्रा म्हणुन हिनवायचे, आमदार पाटील यांना कशाचा माज आहे हा ? लायकी नसताना त्यांना तुळजापूरकरानी 5 वर्ष सत्तेत बसविले मात्र हे कुत्रा म्हणुन बोलतात त्यामुळेच त्यांच्या बुद्धीची कीव येते मात्र लोक हा माज जिरवतील असे ओमराजे म्हणाले.
सिंदफळ येथील कार्यक्रमापुर्वी मी अधिकारी यांना माहिती घेण्यासाठी फोन केल्याची कबुली खासदार ओमराजे यांनी दिली. हो मी अधिकारी यांना फोन केला होता, मी अधिकारी यांनी विचारले की काम पुर्ण झाले आहे का, वीज आहे का तिथे, भुसंपादन मावेजा मिळाला का असे विचारले तेव्हा अधिकारी यांनी काम झाले नाही असे सांगितले. त्यांना उदघाटन्या रोग झाला आहे त्याचा उपचार करायचा आहे असे खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले.