तुळजापूर – समय सारथीराज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे सहकुटुंब तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी 19 नोव्हेंबर रोजी तुळजापूर येथे येणार आहेत. महाराष्ट्र विधानसभेसाठी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असुन त्यापूर्वी ठाकरे हे तुळजाभवानी मातेची पुजा करुन देवीला सत्तेसाठी साकडे घालत आशीर्वाद घेणार आहेत. ठाकरे यांच्या दौऱ्याची तयारी करण्यात आली असुन शिवसैनिकांसह महाविकास आघाडीचे नेते यावेळी उपस्थितीत असणार आहेत.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार यावे व विधानसभेवर भगवा फडकवावा यासाठी ठाकरे हे तुळजाभवानी मातेला साकडे घालणार आहेत. ठाकरे यांच्या सोबत त्यांची पत्नी रश्मी ठाकरे, पुत्र माजी मंत्री आदित्य ठाकरे व तेजस ठाकरे आणि विधान परिषदेचे आमदार मिलींद नार्वेकर हे सोबत असणार आहेत. ठाकरे हे सकाळी 9.40 ला मातोश्रीवरून खासगी विमानाने सोलापूर येथे येतील व त्यानंतर दुपारी 12 वाजता तुळजापूर येथे येऊन तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतील.
धाराशिव जिल्ह्यातील 4 विधानसभा मतदार संघात उस्मानाबाद कळंब व उमरगा येथे शिवसेना उबाठा गट रिंगणात असुन इथे धनुष्यबाण विरुद्ध मशाल अशी थेट लढत आहे तर परंडा येथे शिवसेना शिंदे गट धनुष्यबाण विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गट तुतारी अशी लढत होत आहे. तुळजापूर येथे भाजप विरुद्ध काँग्रेस अशी परंपरागत लढत होत आहे.