धाराशिव – समय सारथी
“विकासाचे” नवे मॉडेल -आमदार राणाजगजीतसिंह पाटलांच्या “दूरदृष्टीचा” पर्दाफाश अशी पोस्ट सोमनाथ गुरव यांनी केली असुन त्यात अनेक गंभीर आरोप केले आहेत.
मित्रांनो, तयार राहा.. आमदार राणा पाटील आणि त्यांच्या कुटुंबाने गेल्या ४० वर्षांत केलेल्या “डोळे दिपवणाऱ्या” विकासाची ही खास झलक! ज्याला बघून तुम्ही थक्क व्हाल (आणि कदाचित हसाल किंवा रडाल)
तेरणाची “अदृश्य” पाईपलाईन: अहो, ही विकासाची गंगा अशी की जी फक्त कागदावरच वाहते! सध्या बंद पडली आहे**, पण काय करणार, विकासाला नजर लागतेच.
हातलाई तलावातील “गायब” संगीत कारंजे: व्वा! ग्रामीण जनतेच्या मनोरंजनाची काय “अफाट” सोय ! आता कारंजे गायब आहेत, पण त्यांच्या आठवणीत आपण नक्कीच रमू शकतो! कदाचित विकासाचा तो एक भाग असावा जो आपल्याला दिसत नाही! गायब होणारा विकास!
8 कोटींचे “गळके” तुळजापूर बस स्टॅन्ड : क्या बात है! आंतरराष्ट्रीय दर्जाचे बस स्टॅन्ड जे पावसाळ्यात टिप..टिप.. बरसतं! ८ कोटी पाण्यात गेले की काय, अशी शंका येते! पण यालाच तर म्हणतात पारदर्शक विकास… पाणी थेट आत!
आणि खरा “विकास” कुठे झालाय माहितीये? आपल्या धाराशिवचा पैसा थेट नेरुळला! स्वतःचा विकास मात्र जोरात! म्हणजे विकासाची दिशा फक्त स्वतःच्या घराकडे! अशा या “अद्वितीय” आणि “स्व-केंद्रित” विकासाला काय म्हणावे? शब्दच नाहीत अशी टीका केली आहे.