धाराशिव – समय सारथी
भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी युती करू असे सांगितले व बोलणीमध्ये गुंतवुन आमच्या पाठीत खंजीर खुपसला, धोका देत फसवले असा आरोप शिवसेना जिल्हा प्रमुख सुरज साळुंके यांनी केली. भाजप शिवसेना युती तुटली असुन आता यापुढे भाजपसोबत लढाई राहील. वरिष्ठ यांच्यासोबत चर्चा करून भुमिका स्पष्ट करणार असल्याचे ते म्हणाले.
धाराशिव नगर परिषद निवडणुकीत शिवसेना शिंदे गट व राष्ट्रवादी अजित पवार गट अशी युती होण्याची शक्यता असुन शिवसेना राष्ट्रवादी गटाच्या नगराध्यक्ष पदाला पाठिंबा देऊ शकते. या दोन्ही पक्षाच्या प्रमुख नेत्यांची आज बैठक होणार असुन त्यापूर्वी शिवसेना पदाधिकारी पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांना भेटून कैफियत मांडतील. शिवसेना पक्षाचे नेते पालकमंत्री प्रतापराव सरनाईक व भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी मुंबईत युती बाबत चर्चा केली व युतीची घोषणा केली. स्थानिक पदाधिकारी यांची स्वतंत्र लढण्याची इच्छा व तयारी होती मात्र पालकमंत्री यांनी युतीचे आदेश दिले त्यानुसार तयारी केली. नगराध्यक्ष पदाची जागा 2016 ला शिवसेनेकडे असतानाही जागा वाटपात नगराध्यक्षपद हे भाजपकडे गेले. 17 ठिकाणी शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल केले त्या ठिकाणी भाजपणे उमेदवार दिले व त्यानंतर बोलणी थांबावली.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना पक्षाला धोका दिला आमच्या पाठीत खंजीर खुपसला. आमच्याकडे नगराध्यक्षपद व 41 उमेदवार असतानाही आम्हाला फसवले गेले, विश्वास ठेवल्याने आम्ही 17 उमेदवार दिले. सगळ्या बाबी व काफीयत वरिष्ठकडे मांडून उद्या आम्ही याबाबत भुमिका व रणनिती स्पष्ट करू असे साळुंके म्हणाले. आम्हाला फसवायचे असते तर सगळे अर्ज भरले असते असेही ते म्हणाले.
2-4 जागा देऊ असे हास्यस्पद भाजप म्हणतं असुन त्यांना त्या जागा सप्रेम भेट देऊ आता आमची त्यांच्या सोबत लढाई आहे त्यांनी आमचा घात केला. बोलणी सुरु ठेवुन त्यांनी आमचा घात केला. इथून पुढची लढाई त्यांची आणि आमची असणार आहे असा इशारा त्यांनी दिला.












