कबुली – शिवसेनेचे एबी फॉर्म राणा पाटलांनी वाटले, ‘या’ नेत्यावर फोडले खापर, बक्षीसी मिळणार
धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्हा परिषद निवडणुकीत शिवसेना पक्षाच्या जागेवर भाजप उमेदवार दिल्याने शिवसैनिक संतप्त असुन पक्ष आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या दावणीला बांधला. कितीत पक्ष विकला, का असे केले असे संतप्त सवाल शिवसैनिक करीत असतानाच शिवसेनेचे राज्य पदाधिकारी अविनाश खापे पाटील व धाराशिव जिल्हा संपर्कप्रमुख राजन साळवी यांची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. शिवसैनिक म्हणुन घ्यायला लाज वाटते असे म्हणत साळवी यांना जाब विचारला तर साळवी यांनी हे सगळे अजित पिंगळे यांच्या अधीपत्याखाली संमतीने झाले असे म्हणत पोलखोल केली.
शिवसेना पक्षाची जी वाताहत झाली त्या राणाजगजीतसिंह पाटील यांची मर्जी असलेल्या नेत्याला आगामी काळात शिवसेना शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष पद बक्षीसी म्हणुन मिळू शकते अशीही चर्चा शिवसैनिकात रंगली आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक हे 25 व 26 जानेवारी रोजी धाराशिव जिल्हा दौऱ्यावर असुन त्यात अनेक राजकीय घडामोडी घडू शकतात.
शिवसैनिक म्हणुन घ्यायला आम्हाला लाज वाटते, तुम्ही दिवसभर शिवसैनिकांशी चर्चा करता व रात्री आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या सोबत बोलणी करता. शिवसेनेचे पक्षाचे एबी फॉर्म आमदार राणाजगजीतसिंह पाटील व त्यांचे पुत्र मल्हार पाटील यांनी वाटले त्यामुळे आम्हाला शिवसैनिक म्हणुन घ्यायला लाज वाटते असे अविनाश खापे म्हणाले त्यावर संपर्कप्रमुख राजन साळवी म्हणाले की हा विषय मला माहिती आहे. त्यांनी एक प्रकारे कबुली दिली.
धाराशिव कळंब हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणुन विधानसभा निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाला देण्यात आला आणि असे काय 4-6 महिन्यात घडले की शिवसेना कमी झाली आणि राणाजगजीतसिंह पाटील यांच्या हातात गेली. उमेदवारी व जागा वाटपा वेळी अजित पिंगळे तिथे होते, अजित पिंगळे विधानसभेचे उमेदवार होते, यांच्या आधीपत्याखाली हे सगळे झाले.पालकमंत्री यांच्या समोर तुमचे खरे खोटं करतो असे साळवी म्हणाले. या सगळ्या बाबीचे खापर त्यांनी पिंगळे यांच्यावर फोडले.
अजित पिंगळे हे 4 वेळेस पराभुत उमेदवार आहेत, ते आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचा माणूस आहे, त्यांनी सगळी सूत्र त्यांच्याकडे दिल्याचा आरोप खापे यांनी केला. पक्षात हुकूमशाही सुरु झाली असुन राणाजगजीतसिंह पाटील यांना बळी पडल्याचा आरोप केला. युती म्हणुन आमची विधानसभा मतदार संघ निहाय राणाजगजीतसिंह पाटील यांच्या बरोबर बैठक झाली, ते मी नाकारत नाही, त्यावेळी माजी आमदार उपनेते ज्ञानराज चौगुले, अजित पिंगळे तिथे होते. उपनेत्यांच्या अधीपत्याखाली हे झाले असे साळवी म्हणाले.
तानाजी सावंत इथे पक्ष वाढीसाठी पाहिजेत, ते नसतील तर आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार खासदार पक्ष संपवून टाकतील. तुम्ही मुंबई येथे बैठका घेतल्या, जिल्हाप्रमुख तालुका प्रमुख यांना न विचारता निर्णय घेतला असे संतप्त सवाल करताच 26 तारखेला तुम्ही पालकमंत्री यांच्या समोर या आपण चर्चा करू असे साळवी म्हणाले. युतीवर शिवसैनिक यांचा शिक्कामोर्तब नाही त्यामुळे तुम्ही भाजप शिवसेना युती नाही असे जाहीर करा, अपक्ष उमेदवारी अर्ज आहेत त्यावर लढू, भुमिका स्पष्ट करा असे आवाहन केले.











