जिल्हा मागास ठेवला तरी नेता भारी, सावंतांमुळे ग्रहण सुटले – जिल्हा परिषद निवडणुकीची तयारी
धाराशिव – समय सारथी
विकासरत्न आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली भैरवनाथ शुगर वर्क्स संचालित ढोकी येथील तेरणा कारखाना परिसरात विजयी संकल्प मेळावा पार पडला. धाराशिव, कळंब व तुळजापूर या मतदार संघातील शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्ते, ऊस उत्पादक शेतकरी व विविध सामाजिक संघटना यांच्या वतीने आमदार प्रा डॉ तानाजीराव सावंत यांचा सत्कार करण्यात आला.
भैरवनाथ समुहाचे संचालक केशव सावंत यांचाही सत्कार करण्यात आला, यावेळी जिल्हा प्रमुख दत्ता अण्णा साळुंके, जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, रामचंद्र घोगरे, तालुका प्रमुख अजित लाकाळ, अजित अण्णा खोत, सुधीर अण्णा पाटील, संजय गाढवे, गौतम लटके, राहुल डोके, अविनाश खापे, संदीप मडके, अमोल पाटील यांच्यासह पदाधिकारी व तेरणा पट्ट्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थितीत होते.
ऍड अजित खोत यांनी विरोधकांवर चौफेर टीका केली. शेतकऱ्यांचा कणा असलेला तेरणा साखर कारखाना सावंत यांनी सुरु केला, शेतकरी याची आर्थिक नाडी असलेली जिल्हा बँकेला यामुळे उभारी आली. धाराशिव जिल्हा देशात 3 नंबर मागास ठेवायचे पाप इथल्या काही राजकीय नेत्यांनी केले तरी आमचा नेता भारी असे म्हणत त्याचे गुणगान केले जाते. सावंत यांच्यामुळे जिल्ह्याचे ग्रहण सुटले. सावंत यांच्या विरोधात सगळे राजकीय नेते पक्ष नगर परिषद निवडणुकीवेळी एकत्र झाले. घराणेशाही जपणाऱ्या भाजप, शिवसेना उबाठा गटाच्या नेत्यांनी परंडा व भुम येथे अभद्र युती केली. माजी आमदार राहुल मोटे यासह इतर नेते आम्हाला गद्दार म्हणाले मात्र तेच विधानसभा निवडणुका झाल्या की अजित पवार गटात गेले व शिवसेना उबाठा गटाचे उमेदवार यांच्या मांडीला मांडी लावुन बसले.
सावंत यांनी बंद पडलेले तेरणा, नृसिंह व इतर कारखाने सुरु केल्याने शेतकरी यांच्या ऊसला भाव मिळाला व त्यांची आर्थिक प्रगती झाली, इतर कारखान्यापेक्षा 100 रुपये जास्त विक्रमी भाव दिला. अतिवृष्टी झाल्यावर स्वखर्चाने मदत केली. ज्यांनी ज्यांनी सावंत यांना वेदना दिल्यात त्या सगळ्या कार्यकर्ते यांच्या मनात आहेत. सावंत यांना रोखण्यासाठी अनेक जन आहेत मात्र त्यांचे अस्तित्व कोणीही संपवू शकत नाही असे ऍड खोत म्हणाले. यावेळी जिल्हा प्रमुख सुरज साळुंके, संदीप मडके, अमोल जाधव, तुळजापूर तालुका अध्यक्ष अमोल जाधव, धाराशिव तालुका अध्यक्ष अजित लाकाळ, धनंजय धाबेकर यांनी मत व्यक्त करून विरोधकावर निशाणा साधला.
फितूरी प्रवृत्ती असलेले व चुकले की अंधारात जाऊन माफी मागणाऱ्या लोकांना जवळ करू नका, प्रामाणिक कार्यकर्ते यांच्यावर विश्वास ठेवा. सावंत यांच्यावर निष्ठा आहे मात्र काही जन सोईनुसार जवळ येतात त्यामुळे कार्यकर्ते यांच्यावर अन्याय होतो, तुम्ही अनेकांच्या चुका पदरात घेऊन मोठ्या मनाने माफ करता, निष्ठावंताकडे पहा असे तालुका प्रमुख अजित लाकाळ म्हणाले, त्यांच्यासह इतरांनी हाच सुर आवळला, चुकलेली हजार दत्तक घ्या पण कार्यकर्ते यांना जपा. पाया पडले व बाप म्हणाले की तुम्ही जवळ करता त्यांना जवळ करा पण त्यापुर्वी चाळणी लावा असे म्हणाले.
जिल्ह्याच्या राजकारणाची संस्कृती बिघडवली असे म्हणत खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, मल्हार पाटील यांच्यावर हे चित्र बदलायचे असेल तर सावंत यांची गरज आहे असे योगेश केदार म्हणाले. वडिलांचा खुन केला, बाप मारला असे ओम राजे म्हणतात तर पाटील हे बाळ म्हणतात. ते दोघे विकासाचे काही करत नाहीत असा आरोप केदार म्हणाले.
भाजप मित्र पक्ष आहे मात्र शिवसेना पक्षावर कुरघोडी करत आहे, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी पालकमंत्री यांचे पाय मुबंईत जाऊन धरले व युतीची बोलणी केली मात्र बोलले एक वागले एक, धोका दिला, शिवसेनेला फसवले. पहाटे 3 पर्यंत बोलणी सुरु ठेवली मात्र नंतर युती मोडली. नगराध्यक्षपद उमेदवार देऊ दिला नाही. फसवून जिंकलेली निवडणुक आहे. राणाजगजीतसिंह पाटील व मल्हार पाटील यांच्या डोक्यात विजयाची हवा शिरली आहे. सावंत यांनी नेतृत्व हाती घ्यावे नाही तर राणाजगजीतसिंह पाटील हे पक्ष संपवल्याशिवाय राहणार नाहीत, आता त्यांनी फसवू नये यासाठी सावंत यांनी निर्णय घ्यावा व आदेश द्यावा आम्ही लढू असे साळुंके म्हणाले. कळंब येथे शिवसेना नावाला आहे मात्र ते भाजपचे काम करीत आहेत. भुम, परंडा येथे सगळ्यांनी एकत्र येत युती केली असे ते म्हणाले.












