धाराशिव – समय सारथी
शिवसेनेच्या बैठकीच्या आधीच धाराशिव येथे राडा झाला असुन माजी आरोग्य मंत्री तथा आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा फोटो नसल्याने सावंत समर्थक आक्रमक झाले असुन बैठकीच्या बाहेर येत घोषणाबाजी केली आहे, यामुळे तणाव निर्माण झाला आहे. शिवसेनेचे धाराशिव समन्वयक राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आज धाराशिव येथे आयोजन करण्यात आले होते, त्या बैठकीच्या अगोदरच सावंत यांचा फोटो का नाही असा जाब विचारण्यासाठी समर्थक जमले.
आमदार डॉ तानाजीराव सावंत यांचा फोटो प्रत्येक वेळी बॅनरवर लावला जात नाही, काही जण पक्ष कार्यक्रम, मेळाव्याच्या बॅनर मुद्दाम फोटो टाळत असल्याने सावंत समर्थक आक्रमक झाले आहेत. राजन साळवी यांच्या अध्यक्षतेखाली धाराशिव जिल्ह्याची स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी आढावा बैठक होणार आहे. बैठक अद्याप सुरु झाली नसुन शिवसैनिक साळवी येण्याची वाट पाहत आहेत.