धाराशिव – समय सारथी
राज्य सरकारने शेतकऱ्यांना सरसकट मदत करून कर्जमुक्ती करावी, शेतकऱ्यांनी खचून न जाता आत्महत्या करू नये असे वचन उद्धव ठाकरे यांनी शेतकरी यांच्याकडून घेतले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आता खरा मराठवाड्याचा दौरा केला पाहिजे. ते जे उत्सव करीत आहेत ना त्यापेक्षा त्यांनी मराठवाडा येथे यावे, इथे काय आक्रोश सुरु आहे हे पाहावे. पंतप्रधान यांना मी आमंत्रण देतो की त्यांनी मराठवाड्यात यावे व शेतकऱ्यांचे आश्रू पुसावे. केंद्रातून भरघोस मदत केंद्र सरकारच्या माध्यमातून करावी असे आवाहन केले.
मी फक्त आता तुम्हाला धीर देऊ शकतो, माझ्या हातात आता काहीही नाही, आत्मविश्वास आहे त्याच्या जोरावर आपण सरकारला झुकवू शकतो. मी कर्जमुक्ती केली पण त्याची जाहिरात केली नाही उपकार केला असे दाखवले नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणतात लाडक्या बहिणींना पैसे देतोयं मात्र ते पैसे देता म्हणजे उपकार करता काय? ते पैसे आजच्या काळात पुरतात का असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी धाराशिव जिल्ह्यातील पूरस्थितीचा आढावा घेत पाहणी केली, यावेळी मिलिंद नार्वेकर, अंबादास दानवे, खासदार ओमराजे निंबाळकर, आमदार कैलास पाटील, प्रवीण स्वामी उपस्थितीत होते.
मला शेतीतल कळतं नाही असे म्हणतात व टीका करतात, मी शेतकऱ्यांना विचारतो, जी शेतजमीन खरडून गेली आहे ती नीट करायला 5 वर्ष लागतात म्हणजे शेतकऱ्यांच्या आयुष्यातील 5 वर्ष गेली. तो पर्यंत शेतकरी यांच्या डोक्यावरील कर्ज कोण फेडणार? त्यांच्या मुलांची शिक्षण कोण करणार? पुस्तकं दप्तरं वाहून गेले, घरात पाणी शिरल्याने शेतकऱ्याचे आयुष्य वाहून गेले आहे ते कसे उभे राहणार?
सरसकट कर्जमाफी या सरकारकडुन करून घेणार, आजच सरकारला मी सांगतो की रस्त्यावर उतरायची वेळ आली तर मी स्वतः मराठवाड्यातील शेतकऱ्यासोबत रस्त्यावर उतरेल व कर्जमाफी करून घेईल. बँका आता कर्जमाफीच्या नोटीस पाठवत असुन शेतकऱ्यांनी त्या नोटीसा शिवसेना शाखेत जमा करा त्या मुख्यमंत्री यांना पाठवू. मी शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावुन रस्त्यावर उतरून शेतकऱ्यांसाठी लढा देईल असे ठाकरे म्हणाले.
शेतकऱ्यांना काहीच मदत मिळत नाही एकरी 3,400 रुपये मदत कमी असुन त्यातून काहीच होत नाही. शेती काढून पुन्हा नीट करायला जास्त पैसे लागतात. एकरी 50 हजार मदत करणे गरजेचे असुन ती सरकारने करावी अशी मागणी ठाकरे यांनी केली. आत्महत्याचा विचार करायचा नाही, खचून जाऊ नका असे वचन त्यांनी शेतकरी यांच्याकडुन घेतले , ज्याच्या मनात आत्महत्या विचार येईल त्याला धीर द्या.