धाराशिव – समय सारथी
धाराशिव जिल्ह्यात शिवसेनेचा शिंदे गट लोकसभा उमेदवारीवरून आक्रमक झालं असुन वाशी येथील पदाधिकारी यांनी सामूहिक राजीनामे देत शिवसेना प्राथमिक सदस्य नोंदणी फॉर्मची होळी आहे. धाराशिव लोकसभा जागा राष्ट्रवादीला दिल्याने शिंदे गट आक्रमक झाला असुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जागा परत घेण्याची मागणी केली आहे. धनंजय सावंत यांना उमेदवारी द्यावी अशी पदाधिकारी कार्यकर्ते याची मागणी व आक्रमक भुमिका आहे.
राष्ट्रवादीकडुन जागा परत शिवसेनाला घ्या अन्यथा सामूहिक राजीनाम्याचा इशारा दिला असुन त्याचा वनवा पेटला आहे. पालकमंत्री डॉ तानाजीराव सावंत यांचे पुतणे धनंजय सावंत यांनी लोकसभेसाठी उमेदवारी मागितली होती शिवाय त्यांचे भावी खासदार असे पोस्टर लागले होते, सावंत यांनी प्रचार सुद्धा सुरु केला होता.
भविष्यात जर महायुतीचा उमेदवार पराभूत झाला तर याला याला धाराशिव जिल्ह्यातील शिवसैनिक जबाबदार असणार नाहीत अशी भावना तालुक्यातील पदाधिकारी यांनी व्यक्त केल्या. त्याचबरोबर तानाजीराव सावंत हे जी भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे व ते जो आदेश देतील तो आम्ही पाळणार असे सांगितले.
बैठकीला शिवसेना वाशी तालुकाप्रमुख सत्यवान गपाट, युवासेनेचे युवा जिल्हाधिकारी बाळासाहेब मांगले, माजी नगराध्यक्ष नागनाथ नायकवाडी,उपतालुकाप्रमुख विकास तळेकर,सतीश शेरकर शहर प्रमुख वाशी युवा सेना तालुकाप्रमुख प्रवीण गायकवाड, उपतालुकाप्रमुख स्वप्निल कोकाटे,सुनील मोरे,रंजीत घुले, नितीन रणदिवे,अतुल चौधरी,अशोक लाखे,उद्धव साळवी,शरद मनगिरे,बालाजी नकाते,दिनकर शिंदे,नाना घुले,सुनील जाधवर,सोमनाथ शिंदे,सुनील उंद्रे, राजाभाऊ सुकाळे,तुकाराम वीर,संदीप लाखे,राजाभाऊ जोगदंड, तानाजी कोकाटे, मुजमील पठाण,राजाभाऊ कोळी,राजाभाऊ सावंत,विनोद खोसे,दत्ता जाधव,नामदेव लहाने,विलास खवले,महेश कोकणे,बाबासाहेब हारे ळ,बाबासाहेब कांबळे,लायक तांबोळी, प्रवीण शेटे,मदन मुरकुटे,बप्पा शिंदे,अक्षय मेटे, अभिषेक गवारे, दत्ता चौधरी,नंदू सुकाळे,बाबू तावरे,अक्षय चव्हाण,मोहन दळवे,पोपट उघडे,अजय देशमुख,अक्षय चव्हाण,राजेंद्र सुकाळे,उमेश सानप,मच्छिंद्र सारूक,राहुल घोळवे तालुक्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित होते.