धाराशिव – समय सारथी
महाराष्ट्र राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे याकरिता मराठा समाज व मनोज जरांगे पाटील यांचा जो संघर्ष चालू आहे त्याला समाजवादी पार्टी तर्फे पूर्णपणे पाठींबा दिला आहे आहे. समाजवादी पार्टी मुसलमानांना आरक्षण मिळावे अशी मागणी गेले अनेक वर्षांपासून सर्व माध्यमाद्वारे शासनाला करत आहे तसेच, मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षणामध्ये मुस्लीम समजाला ५% आरक्षण देण्यात यावे असे आदेश शासनाला करूनही अद्यापपर्यंत शासनाने सदर बाबतीत कोणताही निर्णय घेतलेला नाही. म्हणून मराठा समाजाच्या भावना आम्ही समजू शकतो.
२ सप्टेंबर २०२३ रोजी येथे मराठा आरक्षण आंदोलकांवर आंतरवली सराठी गोळीबार व लाठी हल्ला झाला होता तेव्हा निषेध नोंदवत पूर्णपणे पाठींबा देत पक्षांच्या पदाधिकाऱ्यांनी समक्ष भेट घेऊन समर्थनाचे पत्र समाजवादी पार्टीने दिले होते. अबू आजमी हे मनोज जरांगे यांना भेटणार होतो परंतु त्यांच्या पायाची शस्त्रक्रिया झालेली असल्याने समोरासमोर भेटण्यास येऊ शकत नाही, असे पत्रात नमूद केले आहे.
समाजवादी पार्टी प्रदेशचे प्रवक्ते व महासचिव अॅड. रेवण भोसले, महासचिव अनिस अहमद व महासचिव अब्दुल रऊफ या शिष्टमंडळाने जरांगे यांची भेट घेतली व समाजवादी पार्टीचा पूर्णपणे मराठा आरक्षण आंदोलनाला पाठींबा आहे व आपण मुंबईमध्ये आल्यावर आपले स्वागत समाजवादी पार्टी तर्फे करण्यात येणार आहे असे स्पष्ट केले.